Video: ८१ वर्षांनी झाला दुसऱ्या महायुद्धातील भयंकर बॉम्बचा धमाका, बेघर झाले अनेक लोक...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 12:36 PM2021-03-02T12:36:37+5:302021-03-02T12:37:54+5:30
World war 2 bomb exploded in London's Exeter city : एक्सेटर शहरातील रहिवाशी भागात एक बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. हा बॉम्ब शुक्रवारी एक्सेटर यूनिव्हर्सिट (Exeter University) च्या कंपाउंडमध्ये बघितला गेला होता.
महायुद्धाच्या (Word War) जखमा आजही पूर्णपणे भरलेल्या नहाीत ८१ वर्षानंतरही महायुद्धात झालेल्या धमाक्यांचा आवाज ऐकायला मिळतो. ब्रिटनची राजधानी लंडन (London) च्या एक्सेटर (Exeter) शहरात ९०० किलोग्रॅमचा एक बॉम्ब स्पॉट झाला होता. याची माहिती पोलिसांनी दिली गेली होती आणि तपासानंतर हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धातील (World War 2) भयंकर बॉम्ब निघाला. हा बॉम्ब डिफ्यूज करण्यासाठी संपूर्ण शहरच रिकामं करावं लागलं. या बॉम्बच्या धमाक्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
एक्सेटर शहरातील रहिवाशी भागात एक बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. हा बॉम्ब शुक्रवारी एक्सेटर यूनिव्हर्सिटी (Exeter University) च्या कंपाउंडमध्ये बघितला गेला होता. यानंतर बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड (Bomb Disposal Squad) आणि पोलिसांनी संपूर्ण शहर रिकामं केलं. यूनिव्हर्सिटीतील १४०० विद्यार्थ्यांसहीत ग्लेनोर्नरोडवर राहणारे जवळपास २६०० घरातील लोकांना येथून हलवण्यात आलं.
शुक्रवारी आणि शनिवारी या सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं होतं. हा भयंकर बॉम्ब रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून रविवारी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी डिफ्यूज करण्यात आला होता.
We’ve spent the last 2 days in Exeter supporting the huge multi-agency operation for an unexploded WW2 bomb. This is from the drone the moment it was detonated...
— Devon & Cornwall and Dorset Police Drones (@PoliceDrones) February 28, 2021
(the 2nd clip is thermal imaging)#exeter@BBCNews@SkyNews@DevonLiveNews@DC_Police@BBCSpotlight@itvwestcountrypic.twitter.com/LECX9foVTy
या बॉम्बचा धमाका इतका शक्तीशाली होता की, याचा आवाज जवळपास १० किलोमीटरपर्यंत ऐकायला आला होता. या भयंकर विस्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक भींती आणि खिडक्या तुटल्या आहेत. या व्हिडीओत मलबा उडताना दिसत आहे. बॉम्ब निष्क्रिय केल्यानंतरही लोकांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी अजून देण्यात आलेली नाही.
सेनेचं मत आहे की, हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीच्या हिटलरच्या सेने एक्सेटर शहरावर टाकला असेल. त्यांना भीती आहे की या भागात असे आणखी काही बॉम्ब असू शकतात. पोलिसांनी सांगितले की, सिक्युरिटी ऑडिट केल्यानंतरच लोकांना त्यांच्या घरात जाण्याची परवानगी दिली जाईल. सध्या तुटलेल्या घराच्या दुरूस्तीचं काम सुरू आहे. सोबतच आणखीही बॉम्बचा शोध घेतला जात आहे.