Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 19:44 IST2024-10-02T19:43:17+5:302024-10-02T19:44:00+5:30
Japan Airport Bomb Explosion: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वापरल्या जाणाऱ्या अमेरिकन बॉम्बचा बुधवारी जपानच्या विमानतळावर अचानक स्फोट झाला.

Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
Japan Airport Bomb Explosion: जपानमधीलविमानतळावर एका अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट झाला. स्फोटामुळेविमानतळाच्या टॅक्सीवे वर मोठा खड्डा पडला. यामुळे येथे ८० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. या स्फोटात कोणीही जखमी झाले नसल्याचे जपानी अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिण-पश्चिम जपानमधील मियाझाकी विमानतळावर बॉम्बस्फोट झाला. तेव्हा तेथे कोणतेही विमान नव्हते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सेल्फ डिफेन्स फोर्सेस आणि पोलिसांनी केलेल्या तपासात असे दिसून आले की हा स्फोट ५०० पौंड वजनाच्या अमेरिकन बॉम्बमुळे झाला. मात्र, या घटनेतून सध्या कोणालाही कोणताही धोका नाही. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून अचानक स्फोट कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे.
स्फोटामुळे ८० हून अधिक उड्डाणे रद्द
एव्हिएशन स्कूलमधून रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये हा अपघात दिसत आहे. स्फोटामुळे डांबराचे तुकडे कारंज्याप्रमाणे हवेत उडाल्याचेही मारताना दिसले. जपानी मीडियानुसार, प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये टॅक्सीवेमध्ये खोल खड्डा दिसत आहे. त्यानंतर लगेचच जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी यांनी सांगितले की विमानतळावरील ८० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एका दिवसाच्या अंतराने ऑपरेशन्स पुन्हा सुरू होतील.