विजय दर्डा यांची भारताच्या स्वीडनमधील राजदूतांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 03:52 AM2018-06-20T03:52:06+5:302018-06-20T03:52:06+5:30
‘लोकमत’ मीडियाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी भारताच्या स्वीडन व लाटव्हियातील राजदूत मोनिका कपिल मोहता यांची सोमवारी स्टॉकहोममधील इंडिया हाउसमध्ये भेट घेतली.
स्टॉकहोम : ‘लोकमत’ मीडियाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी भारताच्या स्वीडन व लाटव्हियातील राजदूत मोनिका कपिल मोहता यांची सोमवारी स्टॉकहोममधील इंडिया हाउसमध्ये भेट घेतली. भारतीय राजदूतांचे ते सरकारी निवासस्थान आहे.
विजय दर्डा व मोनिका कपिल मोहता यांच्यातील चर्चेचा भर भारत व स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि स्वीडिश व्यवसाय आणि उद्योगांसाठी भारतीय बाजारपेठेचे वाढते महत्त्व या मुद्द्यांवर होता. व्होल्वो, एरिक्सन, स्कॅनिया, साब, टेट्रा, पाक, एबीबी, अॅटलास कोप्को, एसकेएफ, इलेक्ट्रोलक्स, एच अँड एम, इकिया, सँडविक, अल्फा लावल आदी मोठ्या स्वीडिश कंपन्यांचे भारतात ठळक अस्तित्व आहे. स्वीडन पाश्चिमात्य देशांतील खूप जुना देश भारतात भारतासाठी उत्पादन करतो आणि भारतात तयार केलेली उत्पादने जगभर निर्यात करतो. यातील अनेक कंपन्यांचे उत्पादन पुण्यात होत असते.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, वाहतूक व मूलभूत सोईसुविधामंत्री नितीन गडकरी व महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वीडनला भेट दिल्याने दोन्ही देशांतील संबंध आणखी बळकट झाले आहेत.
स्वीडनने भारताला ऊर्जा, सांडपाणी व्यवस्थापन, सुरक्षा विषयक तंत्रज्ञान व अभियांत्रिकी उत्पादनांतील अभिनव कल्पना या क्षेत्रात भरीव मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. स्वीडनमध्ये प्रगत कल्याणकारी व्यवस्था असून, महिलांना संसद व मंत्रिमंडळात ५० टक्के प्रतिनिधित्व, व्यवसाय व राजकारणात लैंगिक समानता आहे. सर्व नागरिकांना मोफत आरोग्यसुविधा, शिक्षणसुविधा पुरविली जाते. हा देश जगातील सर्वांत पर्यावरणस्नेही देशांपैकी एक आहे. दोन्ही देशांकडे एकमेकांना देण्यासारखे भरपूर असून, संबंध बळकट करण्यास खूप वाव आहे.
महाराष्ट्र मंडळाद्वारे स्वीडनमध्ये मराठी संस्कृती रुजविण्याचे काम करणाऱ्या रूपाली देशमुख यांचेही विजय दर्डा यांनी कौतुक केले.
>2017
मध्ये भारतीय संस्कृती महोत्सवाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते, तसेच एअर इंडियाने स्टॉकहोम-नवी
दिल्ली थेट विमानसेवा सुरू केल्यामुळे दोन्ही बाजूंनी पर्यटक व व्यावसायिकांची
ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्वीडिश अर्थव्यवस्थेत विशेषत: माहिती तंत्रज्ञान
क्षेत्रात भारतीयांनी
मोठे योगदान दिलेले आहे.
भारताच्या स्वीडन व लाटव्हियातील राजदूत मोनिका कपिल मोहता यांची ‘लोकमत’ मीडियाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी सोमवारी भेट घेतली.