विजय माल्या म्हणाला, भारतात माझ्या जीवाला धोका आहे....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 06:35 PM2017-11-20T18:35:31+5:302017-11-20T18:47:16+5:30
भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या विजय माल्यावर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडनमधील न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आज येथील न्यायालयात विजय माल्या हजर झाला होता. यावेळी त्याने भारतात माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगितले.
लंडन : भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या विजय माल्यावर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडनमधील न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आज येथील न्यायालयात विजय माल्या हजर झाला होता. यावेळी त्याने भारतात माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगितले.
बँकांना कोट्यावधींचा गंडा घालून गेलेल्या विजय माल्याला भारताच्या स्वाधीन केले जावे, यासाठी भारत सरकारकडून गेल्या वर्षी ब्रिटेनकडे अर्ज करण्यात आला होता. याला ब्रिटेनकडून देखील सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला होता. यासंबंधीचा सर्व प्रक्रियांची सुरुवात देखील करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी आज येथील वेस्टमिन्स्टर न्यायालयात विजय माल्ला हजर झाला होता. यावेळी न्यायालयात त्याने आपल्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत, असे सांगत भारतात आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, आता पुढील सुनावणीदरम्यान, भारताकडून त्याच्या सुरक्षेबाबत भूमिका मांडण्यात येणार आहे.
#WATCH Vijay Mallya says, 'we all very diligently come to Court' after appearing in London's Westminster Court today. pic.twitter.com/JJRlmA2cOQ
— ANI (@ANI) November 20, 2017
विजय माल्याने व्यवसायाच्या नावावर भारतातील बँकांकडून 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे सर्व थकीत कर्ज तसेच ठेऊन त्याने इंग्लंडला पलायन केले होते. त्यानंतर सीबीआय आणि इडीने केलेल्या कारवाईत माल्याची भारतातील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तसेच माल्याला फरार म्हणून घोषित करत त्यावर अजामीनपात्र अटक वॉरंट देखील जारी करण्यात आले आहे.
Vijay Mallya appeared in London's Westminster Court today. Mallya's side argued that he fears for his life in India, now prosecution is preparing a submission by the Indian government outlining the security measures that will be in place for him. pic.twitter.com/VQbuNt7Lzo
— ANI (@ANI) November 20, 2017