'या' गावात मगरीला आहे देवाचं स्थान, पूजेबरोबरच लोक तासन् तास घालवतात वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 04:47 PM2018-06-19T16:47:09+5:302018-06-19T16:47:09+5:30
गावातील लोक मगरीची पूजा करतात.
प्रेटोरिया- मगर अतिशय भयानक जीव असल्याचं आपण मानतो. जर कधी चुकूनही मगर समोर आली, तर काय हालत होईल याचा अंदाजही लावणं कठीण आहे. पण एक असं गाव आहे जिथे मगरीला देवाचं स्थान दिलं जातं. इतकंच नाही, तर त्या गावातील लोक मगरीची पूजा करतात व तिच्यासोबत तासन् तास वेळही घालवितात. त्या गावातील लहान मुलंच नाही तर मोठी माणसं मगर ही पाळीव प्राणी असल्यासारखं तिच्यावर बसतात.
आफ्रिकी देश बुर्कीना फासोमध्ये हे गाव असून बजूले असं या गावाचं नाव आहे. बुर्कीना फासोपासून 30 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावातील एका तलावात 100 हून जास्त मगरी आहेत. गावातील काही मुलं जेव्हा लहान होती तेव्हा ते लोक मगरीवर बसायचे. तिच्याबरोबर पाण्यात पोहण्याचाही आनंद घ्यायचे. या गावातील मगरी पवित्र असून त्या तेथिल लोकांना हानी पोहचवत नाही, असं गावातील एका व्यक्तीने सांगितलं.
15 व्या शतकापासून मगर व त्या गावातील लोकांचं नातं आहे. एके वेळी गावात भीषण दुष्काळ होता त्यावेळी तेथिल एका मगरीने एका महिलेला छुप्या तलावापर्यंत पोहचवलं. त्या मगरीमुळे गावातील लोकांची पाणी संकट दूर झालं, असा तेथिल लोकांचा समज आहे. तेव्हा तेथिल लोकांनी मगरीचे आभार मानायला खास कार्यक्रमही आयोजीत केला होता. आताही तसे कार्यक्रम आयोजीत केले जातात.
त्या गावात मगरींना पूर्वजांचा आत्मा मानला जातो. त्या मगरीपैकी एक मगर जरी मेली तरी तिला त्या मगरीवर एखाद्या व्यक्तीप्रमाणे अंतिमविधी केले जातात. माणसाचा निधन झाल्यावर ज्याप्रमाणे त्या माणसाला दफन करतात तसंच मगरीलाही केलं जातं. गावात जर काही वाईट घटना घडणार असेल तर त्याआधी मगर रडायला सुरू करते, असा समज तेथिल लोकांचा आहे.