श्रीलंकन यादवीत मानवी अधिकारांचे उल्लंघन
By Admin | Published: September 17, 2015 03:29 AM2015-09-17T03:29:32+5:302015-09-17T03:29:32+5:30
श्रीलंकेतील यादवी युद्धामध्ये सरकार तसेच तमिळींच्या हक्कांसाठी लढणारी एलटीटीई अशा दोन्ही पक्षांकडून मानवी अधिकारांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष संयुक्त
न्यूयॉर्क : श्रीलंकेतील यादवी युद्धामध्ये सरकार तसेच तमिळींच्या हक्कांसाठी लढणारी एलटीटीई अशा दोन्ही पक्षांकडून मानवी अधिकारांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष संयुक्त राष्ट्राने तयार केलेल्या अहवालात आहे. या प्रकरणामध्ये पीडितांना न्याय मिळावा, यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी संयुक्त राष्ट्राच्या मानवी अधिकार विभागाचे उच्चायुक्त झैद राद अल हुसैन यांनी केलेली आहे. २००९ साली युद्ध संपण्याच्या अंतिम टप्प्यात मानवी अधिकारांचे सर्वाधिक उल्लंघन झाल्याचे तसेच माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या कार्यकाळावरही यामध्ये बोट ठेवण्यात आले आहे.