गॅबनमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीनंतर हिंसाचार; संसदेलाच लावली आग!
By admin | Published: September 1, 2016 03:35 AM2016-09-01T03:35:02+5:302016-09-01T03:55:14+5:30
आफ्रिकेतील गॅबनमध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्रपती अली बोन्गो विजयी झाले. बुधवारी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला.
ऑनलाइन लोकमत
लेब्रेविल, दि. १ : आफ्रिकेतील गॅबनमध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्रपती अली बोन्गो विजयी झाले. बुधवारी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. शनिवारी येथे निवडणूक झाली होती. बोन्गों यांच्या विजयानंतर विरोधी पक्षाचे उमेदवार जीन पिंग यांच्या सर्मथकांनी राजधानी लिब्रेव्हिल येथील ससंदेलाच आग लावली.
लिब्रेव्हिल येथील आगीच्या घटनेनंतर प्रदर्शनकार्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. काही प्रदर्शनकर्त्ये तेथील निवडणुक आयोगाच्या कार्यालयावर चालुन गेले असता त्यांच्यावरही अश्रुधुराचा वापर करण्यात आला.
बोन्गो यांना ४९.८ टक्के मतं मिळाली तर पिंग यांना ४८.२ टक्के मतं मिळाली. बोन्गो यांचा विजय अवघ्या ५५९४ मतांनी झाला. यामुळे जीन पिंग यांच्या सर्मथकांमध्ये निकालाबाबत प्रंचड असंतोष निर्माण झाला. काही प्रदर्शनकर्त्ये तेथील निवडणुक आयोगाच्या कार्यालयावर चालुन गेले असता त्यांच्यावरही अश्रुधुराचा वापर केला.