Al-Aqsa mosque: अल-अक्सा मशीदीमध्ये हिंसाचार; इस्त्रायलच्या सैनिकांची कारवाई, १५० हून अधिक पॅलेस्टीनी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 01:58 PM2022-04-15T13:58:46+5:302022-04-15T14:32:38+5:30

अल-अक्सा मशीद ज्यू आणि ख्रिश्चनांसाठी देखील एक पवित्र स्थान मानली जाते. हे ज्यूंचे सर्वात मोठे पवित्र स्थान आहे. ज्यूबहुल इस्रायल आणि मुस्लिमबहुल पॅलेस्टाईन यांच्यातील अनेक दशकांपासून ही मशीद संघर्षाचे केंद्र बनली आहे.

Violence at Al-Aqsa Mosque; 67 Palestinians wounded in Israeli forces action | Al-Aqsa mosque: अल-अक्सा मशीदीमध्ये हिंसाचार; इस्त्रायलच्या सैनिकांची कारवाई, १५० हून अधिक पॅलेस्टीनी जखमी

Al-Aqsa mosque: अल-अक्सा मशीदीमध्ये हिंसाचार; इस्त्रायलच्या सैनिकांची कारवाई, १५० हून अधिक पॅलेस्टीनी जखमी

googlenewsNext

जेरुसलेम : इस्लामचे तिसरे पवित्र स्थान असलेल्या जेरुसलेमची अल अक्सा मशीदीमध्ये आज इस्त्रायल सैनिक आणि पॅलेस्टिनींमध्ये हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी पहाटेच झालेल्या या हिंसाचारात ६७ पॅलेस्टीनी नागरिक जखमी झाले आहेत. 

इस्त्रायल नेहमीच या मशीदीवर आपला हक्क सांगत आला आहे. यामुळे अनेकदा ही मशीद हिंसाचाराचे कारण बनली आहे. या मशीदीमध्ये पॅलेस्टीनींना जाण्यावर निर्बंध आहेत. परंतू, रमजान असल्याने त्यांना सूट देण्यात आली होती. इस्त्रायलच्या सैन्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करण्य़ासाठी दगड, हत्यारे गोळा करण्यात आल्याची खबर मिळाली होती. ते हटविण्यासाठी इस्त्रायलचे सैन्य मशीदीमध्ये गेले. 

यावेळी नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी आतमध्ये होते. वृत्तसंस्था एपीनुसार अल अक्सा मशीदीच्या समितीने सांगितले की, इस्त्रायल पोलीस सकाळ होण्याआधीच मशीदीत आले होते. तर इस्त्रायलने सांगितले की, रमजानच्या निमित्ताने हजारो लोक मशीदीत गोळा झाले होते. आमच्या सैन्याने आतमध्ये हिंसा करण्यासाठी ठेवण्यात आलेले दगड हटविण्यासाठी आतमध्ये कारवाई केली. 

अल-अक्सा मशीद ज्यू आणि ख्रिश्चनांसाठी देखील एक पवित्र स्थान मानली जाते. हे ज्यूंचे सर्वात मोठे पवित्र स्थान आहे. ज्यूबहुल इस्रायल आणि मुस्लिमबहुल पॅलेस्टाईन यांच्यातील अनेक दशकांपासून ही मशीद संघर्षाचे केंद्र बनली आहे. व्हिडिओंमध्ये पॅलेस्टिनी लोक दगडफेक करताना आणि इस्रायली पोलिस अश्रूधुराचे नळकांडे फेकताना दिसत आहेत. काही व्हिडिओंमध्ये अश्रुधुरापासून वाचण्यासाठी लोक मशिदीत लपून बसलेले दिसतात.
पॅलेस्टाईनच्या रेड क्रेसेंट आपत्कालीन सेवेने सांगितले की त्यांनी 67 जखमींना रुग्णालयात हलविले आहे. हे लोक रबरी गोळ्या आणि ग्रेनेडमुळे जखमी झाले होते. जखमींची संख्या १५० वर गेल्याचे सांगण्यात आलेआहे. घटनास्थळावरील एका गार्डच्या डोळ्यात रबरी गोळी झाडण्यात आली होती. तर इस्त्रायलने म्हटले आहे की, दगडफेकीत तीन अधिकारी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
 

Web Title: Violence at Al-Aqsa Mosque; 67 Palestinians wounded in Israeli forces action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.