US Capitol: डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा कॅपिटल बिल्डिंगमध्ये धूडगूस, गोळीबारात एका महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 07:33 AM2021-01-07T07:33:14+5:302021-01-07T07:55:40+5:30
US Capitol: वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
वाशिंग्टन : २०२० मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर अद्याप राजकीय पेच सुरूच आहेत. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष यांच्याकडून निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप करत दबाव आणला जात होता. यातच आता डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी (Donald Trump supporters) व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगबाहेर गर्दी करुन जोरदार गोंधळ घातला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले जो बायडेन (Joe Biden) यांनी ट्रम्प यांना संविधानाची सुरक्षा करण्याचे आवाहन केले आहे. "मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी आपली शपथ पूर्ण करण्यासाठी तात्काळ राष्ट्रीय प्रसारमाध्यमावर जावे आणि संविधानाची सुरक्षा करावी आणि हे सर्व थांबवावे", असे जो बायडेन म्हणाले. याचबरोबर, कॅपिटल बिल्डिंगमध्ये जो गोंधळ आपण पाहिला आहे, ते आम्ही नाही आहोत. ही कायदा न मानणाऱ्या लोकांची खूप कमी संख्या आहे. हा देशद्रोह आहे, असे जो बायडेन यांनी सांगितले.
#WATCH | I call on President Trump to go on national television now to fulfil his oath and defend the Constitution and demand an end to this siege: US President-Elect Joe Biden on US Capitol mob violence pic.twitter.com/CEaChwBsdd
— ANI (@ANI) January 6, 2021
हिंसाचारात एका महिलेचा मृत्यू, अनेक जण जखमी
निवडणुकीच्या निकालाबाबत अमेरिकेच्या संसदेच्या बोलावलेल्या बैठकीपूर्वी ट्रम्प समर्थकांची गर्दी व्हाइट हाऊस आणि अमेरिकन कॅपिटल इमारतीच्या बाहेर जमा झाली आहे. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगमध्येही गोंधळ केली आहे. यावेळी पोलीस आणि सर्मथकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये या हिंसाचारात एका महिलेचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती आहे. वॉशिंग्टन डीसी पोलीस प्रमुखांनी सांगितले की, कॅपिटलमध्ये एक महिलेला गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. तर या हिंसाचारात अनेक अधिकारी जखमी झाले आहेत.
#UPDATE | Violence at US Capitol: Woman who was shot inside the Capitol on Wednesday afternoon (local time) has died at a hospital, reports CNN
— ANI (@ANI) January 6, 2021
ट्रम्प यांचे समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. आपल्या समर्थकांना शांततेत निषेध करण्याचे आवाहन करीत ट्रम्प म्हणाले की, आंदोलनात कोणतीही हिंसाचार होऊ नये. लक्षात ठेवा आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा पक्षात आहोत.
फेसबुकने हटविला ट्रम्प यांचा व्हिडीओ
ट्विटरनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ फेसबुकने डिलीट केला. दरम्यान, अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले होते. "आम्ही ट्रम्प यांचा व्हिडिओ हटविला आहे, कारण ट्रम्प यांचा व्हिडिओ सुरु असलेल्या हिंसाचार कमी करण्याऐवजी प्रोत्साहन देत होता," असे फेसबुकचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंटीग्रिटी गाय रोसेन यांनी म्हटले आहे.
Facebook removes US President Donald Trump's video addressing his supporters during violence at US Capitol
— ANI (@ANI) January 6, 2021
"We removed it because on balance we believe it contributes to rather than diminishes the risk of ongoing violence," tweets Facebook Vice President of Integrity, Guy Rosen https://t.co/fdCneDzNwq