कराची प्रेस क्लबवर गुंडांचा हिंसक हल्ला, काही पत्रकार जखमी
By admin | Published: March 28, 2016 05:19 PM2016-03-28T17:19:35+5:302016-03-28T17:19:35+5:30
कराची प्रेस क्लबवर रविवारी 60 ते 70 जणांच्या जमावाने हल्ला केला असून मुमताझ कादरीच्या फाशीच्या विरोधात धार्मिक संघटनांनी केलेल्या आंदोलनाचा हा एक भाग होता
Next
>ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 28 - कराची प्रेस क्लबवर रविवारी 60 ते 70 जणांच्या जमावाने हल्ला केला असून मुमताझ कादरीच्या फाशीच्या विरोधात धार्मिक संघटनांनी केलेल्या आंदोलनाचा हा एक भाग होता. पंजाबचे राज्यपाल सलमान तासीर यांच्या हत्येप्रकरणी काझीला फाशीची शिक्षा झाली होती.
अंजुमन तलबा ए इस्लाम या संघटनेने निदर्शने लाइव्ह का दाखवत नाही असे विचारत हिंसक जमावाने प्रेस क्लबवर हल्ला केला. प्रक्षेपणाचा व प्रेस क्लबचा काही संबंध नसतो, हे क्लबच्या पदिदिकाऱ्यांचे म्हणणे निदर्शकांच्या पचनी पडले नाही आणि त्यांनी लाठ्या काठ्या व पेट्रोल बाँबसह क्लबमध्ये घसून तोडफोड केली. काही पत्रकार जखमी झाले तर कॅमेरे व अन्य साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
कराची प्रेस क्लबचे अध्यक्ष फाझिल जामिली यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. या गुंडांनी काही कॅमेरे व अन्य उपकरणे चोरल्याचा आरोपही जामिली यांनी केला. या हल्ल्याचे फोटो व चित्रीकरण उपलब्ध असून हल्लेखोरांची ओळख पटवायला याचा उपयोग होईल असे त्यांनी म्हटले आहे. आज या प्रकरणी सात संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
भारतातल्या पत्रकारांनीही या घटनेचा निषेध केला आहे.