लंडनमध्ये शिखांच्या आंदोलनाला हिंसक वळण, २० अटकेत
By admin | Published: October 24, 2015 02:53 AM2015-10-24T02:53:47+5:302015-10-24T02:53:47+5:30
पंजाब पोलिसांच्या कथित अमानुषतेविरुद्ध येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर सुरू असलेल्या शिखांच्या निदर्शनांना अचानक हिंसक वळण लागून एक पोलीस जखमी झाला.
लंडन : पंजाब पोलिसांच्या कथित अमानुषतेविरुद्ध येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर सुरू असलेल्या शिखांच्या निदर्शनांना अचानक हिंसक वळण लागून एक पोलीस जखमी झाला. त्यानंतर ब्रिटनच्या पोलिसांनी २० निदर्शकांना अटक केली.
‘शिख लाइव्हज् मॅटर’ या संघटनेच्या शेकडो निदर्शकांनी गुरुवारी येथे धरणे आंदोलन केले. सुरुवातीला शांततेत सुरू असलेले हे आंदोलन नंतर हिंसक झाल्यामुळे पोलिसांना भारतीय उच्चायुक्तालयाजवळील भागाची नाकेबंदी करावी लागली. भारतीय उच्चायुक्तालयासमोरील नियोजित आंदोलनाची माहिती आम्हाला होती. मात्र, आंदोलकांनी अचानक रास्ता रोको करून वाहतूक अडविली. त्यामुळे कारवाई करणे भाग पडले, असे पोलिसांनी सांगितले.