चिमुकल्याच्या अंगी बॉल हवेत झुलवत ठेवण्याचे कौशल्य, नेटीझन्समध्ये व्हिडीयो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 07:15 PM2017-11-06T19:15:23+5:302017-11-06T19:25:50+5:30
वयाने अगदीच लहान वाटणारा हा मुलगा बॉल अजिबात खाली न पडू देता तसाच पायावर टोलवत राहतो.
आंतरराष्ट्रीय : लहान मुलांना प्रत्येक खेळाबद्दल फार उत्सुकता असते. त्यामुळे हातात येईल त्या प्रत्येक खेळण्यासोबत ते खेळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक चिमुकला बॉल अजिबात खाली न पडता त्याला पायावर झेलतोय. या खेळाला किपी अपी म्हणतात. खरंतर या खेळासाठी फार मेहनत लागते.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जवळपास ३ वर्षांचा मुलगा आपल्या पायांच्या तालावर फुटबॉलला खेळवतोय. चेंडू अजिबात खाली पडू न देता पायावर तो झेलणं काही कमी अवघड नाही. नजर अजिबात इथे-तिथे न हलवता चेंडू पायाच्या जोरावर झेलण्यासाठी त्या चिमुकल्याची कसरत पाहताना आपल्यालाच फार मजा येते.
हा व्हिडिओ कुठचा आहे आणि व्हिडिओमधल्या त्या मुलाचं नाव काय आहे, याची अजूनही कोणतीच माहिती प्राप्त झाली नसली तरी मुलाची ही कला पाहून सारेच जण थक्क झाले आहेत. फेसबुकवर तर या व्हिडिओला क्रीडाप्रेमींनी तुफान शेअर केलाय. किपी अपी हा खेळ फार कठीण आहे. त्यासाठी भरपूर सराव करावा लागतो. सरावा दरम्यान दुखापतही होते. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच या खेळाचा सराव करावा लागतो. हा खेळ खेळताना समयसुचकता लागते. एखादी किक जरा तरी चुकीची पडली तरी खेळाडू धाडकन खाली पडतो. त्यामुळे वरवर पाहता हा खेळ फार सोपा वाटत असला तरी त्यासाठी तितक्याच सरावाची गरज आहे. म्हणूनच या चिमुकल्यांचं कित्येकांनी कौतुक केलंय. एवढ्या लहान वयात त्याने सराव कधी केला आणि एवढा निष्णांत कधी झाला याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.
दरम्यान, काही क्रीडा प्रेमी म्हणतात की याच्यात आम्हाला भावी खेळाडू दिसतोय. त्यामुळे या मुलाने त्याचा हा खेळ असाच सुरू ठेवून पुढे बरंच नावलौकिक कमवावं.