रशियाच्या समुद्रात सापडला महाकाय मासा, सोशल मीडियावर फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 01:43 PM2017-09-18T13:43:55+5:302017-09-18T14:21:29+5:30

रशियाच्या समुद्रात तब्बल एक टनाचा मासा आढळला आहे. या माशाची चर्चा सर्वत्र होत आहेच. मात्र, याचे फोटो गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियात मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत. 

Viral fish found in the sea of ​​Russia, photos on social media, viral | रशियाच्या समुद्रात सापडला महाकाय मासा, सोशल मीडियावर फोटो होतायेत व्हायरल

रशियाच्या समुद्रात सापडला महाकाय मासा, सोशल मीडियावर फोटो होतायेत व्हायरल

googlenewsNext

साखलिन, दि. 18 - जगभरात रोज नवीन नवीन घडणा-या घटना समोर येत असतात, त्या पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटते. अशीच एक आश्चर्यकारक घटना म्हणजे रशियाच्या समुद्रात तब्बल एक टनाचा मासा आढळला आहे. या माशाची चर्चा सर्वत्र होत आहेच. मात्र, याचे फोटो गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियात मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत. 
पश्चिम रशियातील साखलिन (Sakhalin) येथील समुद्रात मच्छीमारांच्या जाऴ्यात जवळपास 1,100 किलो इतक्या वजनाचा Sunfish या जातीचा मासा सापडला. जगभरातील आतापर्यंत सापडलेला हा सर्वाधिक मोठा मासा असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, हा मासा पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. येथील एका मच्छीमाराने सांगितले की, आतापर्यंत अनेक मासे पडकले. मात्र समुद्रात इतका मोठा मासा असतो, याबाबत  मला काहीच माहिती नव्हती. समुद्रातील काही डॉल्फीन माशांचा आकार 1.5 मीटरपर्यंत असल्याचे माहीत आहे. मात्र, Sunfish सारखा इतका मोठा मासा समुद्रात असतो, ते आता प्रत्यक्षात पाहिल्यावर समजले, असेही त्या मच्छीमाराने सांगितले.  


सध्या  Sunfish ची सोशल मीडियात मोठ्याप्रमाणात चर्चा होत असून त्याचे फोटो सुद्धा व्हायरल होत आहे. याचबरोबर, पश्चिम रशियातील Sakhalin येथील समुद्रातील आधीही अशाप्रकारचे वेगवेगळे मासे सापडले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विजयदुर्ग समुद्रात मच्छीमारी करत असताना मच्छीमार मुनीर मुजावर यांच्या जाळ्यात तब्बल 700 किलो वजनाचा आणि 20 फुट लांबीचा नालिया जातीचा भला मोठा मासा सापडला होता.

Web Title: Viral fish found in the sea of ​​Russia, photos on social media, viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.