१५७ वेळा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास; ३ लाखांची फी भरून अखेर झाला पास

By जयदीप दाभोळकर | Published: January 14, 2021 02:37 PM2021-01-14T14:37:11+5:302021-01-14T14:41:11+5:30

१५८ व्या वेळी केलेल्या अर्जानंतर त्यानं पास केली टेस्ट

viral news this man finally passes his learner drivers test after failing 157 times news from england social | १५७ वेळा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास; ३ लाखांची फी भरून अखेर झाला पास

१५७ वेळा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास; ३ लाखांची फी भरून अखेर झाला पास

googlenewsNext
ठळक मुद्दे१५७ वेळा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये झाला नापासदुसऱ्या क्रमांकावर महिला, आतापर्यंत ११७ वेळा टेस्ट देऊनही झाली नाही पास

तुम्ही ड्रायव्हिंग टेस्टमध्ये कधी नापास झालायत? आणि झालाही असाल तर एकदा किंवा जास्तीत जास्त पाहिलं तर १० वेळा नापास झाला असाल. परंतु इंग्लंडमधील एका व्यक्तीनं ड्रायव्हिंग टेस्टमध्ये तब्बल १५७ वेळा नापास होत विक्रमच केला. यानंतरही त्यानं हार मात्र पत्करली नाही आणि १५८ व्या वेळी तो या ड्रायव्हिंग टेस्टमध्ये पास झाला.
 
प्रत्येक वेळी परीक्षा देण्यासाठी फी तर लागणारचं आणि हे सामान्य बाबही आहे. पण या व्यक्तीच्या बाबतीत घडलेली बाब मात्र असामान्य आहे. त्यानं  १५८ वेळा अर्ज करण्यासाठी तब्बल ३ हजार पौंड म्हणजेच जवळपास तीन लाख रूपयांचा खर्चही केला. "ही बाब अत्यंत खरी आहे आणि जर तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट पास झाला नाहीत तर तुम्हाला केवळ प्रयत्नांवर प्रयत्न हे करतच राहावं लागतं," अशी माहिती सिलेक्ट कार लिसिंगच्या अध्यक्षांनी दिली. 

केवळ याच व्यक्तीनं इतक्यांदा ही टेस्ट दिली असं बिलकुल नाही. ड्रायव्हिंग अँड व्हेईकल स्टँडर्ड एजन्सीद्वारे जारी केलेल्या आकडेवारीवरून इंग्लंडमध्ये सर्वात खराब कामगिरी एका महिलेची होती. तिनं ११७ वेळा टेस्ट दिली आणि अद्यापही त्यात यात पास झाली नाही. तर तिसऱ्या क्रमांकावरही एक ४८ वर्षीय महिला आहे जिनं अखेर आपल्या ९४ व्या प्रयत्नामध्ये ती टेस्ट पास केली. 
 

Web Title: viral news this man finally passes his learner drivers test after failing 157 times news from england social

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.