Visa Interview : फिंगरप्रिंट्स रजिस्टर करण्यासाठी मुंबईतील ठिकाण बदलले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 09:35 AM2018-12-22T09:35:08+5:302018-12-22T09:38:48+5:30
प्रश्न : व्हिसा मुलाखतीसाठी फिंगरप्रिंट्स रजिस्टर करण्यासाठी मुंबईतील ठिकाण बदलल्याचे ऐकले. मला फिंगरप्रिंट्स रजिस्टर करावे लागेल का? याचे नवीन ठिकाण कुठे आहे?
प्रश्न : व्हिसा मुलाखतीसाठी फिंगरप्रिंट्स रजिस्टर करण्यासाठी मुंबईतील ठिकाण बदलल्याचे ऐकले. मला फिंगरप्रिंट्स रजिस्टर करावे लागेल का? याचे नवीन ठिकाण कुठे आहे?
उत्तर - हो, 14 वर्षांखालील किंवा 79 वर्षांवरील अर्जदार वगळता सर्व व्हिसा अर्जदारांना व्हिसा मुलाखतीपूर्वी फिंगरप्रिंट रजिस्टर करणे आवश्यक आहे. Tourist Visa, Student Visa किंवा Immigrant Visa यांसारख्या Nonimmigrant Visaसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला व्हिसा मुलाखतीपूर्वी फिंगरप्रिंट रजिस्टर करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला Biometrics Appointment ची वेळ निश्चित करावी लागेल, या भेटीत तुमचे फिंगरप्रिंट्स रजिस्टर आणि डिजिटल पद्धतीनं फोटो घेतला जाईल. www.usatraveldocs.com/in या संकेतस्थळावर यासंदर्भातील अपॉइंटमेंट नियोजित केल्या जाऊ शकतील.
(पासपोर्टवरील नाव बदलल्यावर काय कराल?)
व्हिसा अॅप्लिकेशन सेंटर (VAC)चे नवीन ठिकाण
परिनी क्रेस्केन्झो, 101, पहिला मजला, ए विंग, जी ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व
व्हिसा अॅप्लिकेशन सेंटरचे नवीन ठिकाण मुंबई कॉन्स्युलेटच्या अगदी जवळ आहे. ज्या व्हिसा अर्जदारांनी Biometrics Appointment साठी किंवा पासपोर्ट स्वीकारण्यासाठी मुंबई व्हीएसीची निवड केली आहे, त्यांनी वरील नमूद पत्त्यावर भेट द्यावी.
फिंगरप्रिंट्स रजिस्टर करण्यासाठी देशातील आमच्या कोणत्याही व्हिसा अॅप्लिकेशन सेंटरला तुम्ही भेट देऊ शकता. व्हिसा मुलाखतीपूर्वी 45 दिवसांमध्ये फिंगरप्रिंट्स रजिस्टर करण्यासाठी व्हीएसीमध्ये तुमची अपॉइंटमेंट ठरवली जाऊ शकते. पण बहुतांश जणांना मुलाखतीपूर्वीच्या दिवशीच फिंगरप्रिंट रजिस्टर करणं सोयीस्कर वाटते.
Biometrics Appointment साठी ज्या व्हिसा अॅप्लिकेशन सेंटरमध्ये तुमची भेट नियोजित करण्यात आली आहे तेथे जा. यावेळेस मान्यता पत्र आणि अन्य अत्यावश्यक दस्तावेज सोबत घेऊन जा. या भेटीदरम्यान तुमचा फोटो आणि डिजिटल पद्धतीनं तुमच्या हाताच्या दहा बोटांचे ठसे घेतले जातात, अगदी काही वेळातच ही प्रक्रिया पार पाडली जाते.
Biometrics Appointment दरम्यान सेंटरकडून तुम्ही अर्जामध्ये नमूद केलेली सर्व माहिती आणि अत्यावश्यक असलेली दस्तावेज पडताळून पाहिली जातात. व्हिसा मुलाखतीसाठी विलंब टाळण्यासाठी या सर्व प्रक्रिया फायदेशीर ठरतात.
व्हिसा मुलाखतीच्या दिवशी तुमचे फिंगरप्रिंट्स आणि फोटो पडताळून त्याची खातरजमा केली जाते.