एकाच व्हिसावर ब्रिटन, आयर्लंडला भेट देता येणार
By admin | Published: October 8, 2014 02:56 AM2014-10-08T02:56:14+5:302014-10-08T02:56:14+5:30
आयर्लंडसोबत सोमवारी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
लंडन : डिसेंबर २०१४ पर्यंत भारतीय एकाच व्हिसावर आयर्लंड व ब्रिटनला भेट देऊ शकतील. संयुक्त प्रवास क्षेत्र वाढविण्यासाठी ब्रिटनच्या गृहमंत्री थेरेसा मे यांनी आयर्लंडसोबत सोमवारी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
या करारामुळे ब्रिटन आणि आयर्लंडला स्थलांतरविषयक प्रकरणांत निर्णय घेण्यास उपयुक्त माहितीची परस्परांना देवाणघेवाण करता येणार आहे. याशिवाय चीन व भारतातून येणारे पर्यटक सहजपणे दोन्ही देशांचा प्रवास करू शकतील. ब्रिटिश-आयरिश व्हिसा योजनेमुळे भारतीय व चिनी पर्यटकांना एकाच व्हिसावर दोन्ही देशांना भेट देता येणार आहे. ही योजना चीनमध्ये आॅक्टोबर अखेरीस सुरू होईल, तर त्यानंतर लगेचच भारतात सुरू होईल. या योजनेचा १0 हजार भारतीय नागरिक लाभ घेण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)