व्लादिमीर पुतिन यांना गंभीर आजार, लवकरच राष्ट्रपतीपद सोडणार?

By बाळकृष्ण परब | Published: November 6, 2020 09:50 AM2020-11-06T09:50:02+5:302020-11-06T09:54:33+5:30

Vladimir Putin News : गेल्या २० वर्षांपासून रशियामध्ये सत्तेत असणारे मातब्बर नेते व्लादिमीर पुतिन हे पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

Vladimir Putin is battling a serious illness, may resign at the request of his girlfriend? | व्लादिमीर पुतिन यांना गंभीर आजार, लवकरच राष्ट्रपतीपद सोडणार?

व्लादिमीर पुतिन यांना गंभीर आजार, लवकरच राष्ट्रपतीपद सोडणार?

Next
ठळक मुद्देपुतिन हे पार्किसन्स आजाराशी झुंजत असून, त्यांच्या हल्लीच्या फोटोंमधून त्यांना झालेल्या या आजाराची लक्षणे दिसत आहेतपुतीन यांची प्रेयसी आणि त्यांच्या दोन मुली पुतिन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेतपुतिन हे जानेवारी महिन्यात सत्ता अन्य कुणाकडे तरी सोपवून कार्यमुक्त होऊ शकतात

मॉस्को - जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेले आणि गेल्या २० वर्षांपासून रशियामध्ये सत्तेत असणारे मातब्बर नेते व्लादिमीर पुतिन हे पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. पुतिन यांनी रशियाच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहन पुतिन यांची गर्लफ्रेंड अलिना कबाइला आणि पुतिन यांच्या दोन मुलींनी केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुतिन हे पार्किसन्स आजाराशी झुंजत असून, त्यांच्या हल्लीच्या फोटोंमधून त्यांना झालेल्या या आजाराची लक्षणे दिसत आहेत.

मॉस्कोमधील राजकीय विश्लेषक वलेरी सोलोवेई यांनी ब्रिटिश वृत्तपत्र द सन ला सांगितले की, रशियन राष्ट्रपतींची प्रेयसी आणि त्यांच्या दोन मुली पुतिन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेत. पुतिन यांचे कुटुंब असून, कुटुंबातील सदस्यांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. त्यामुळे पुतिन हे जानेवारी महिन्यात सत्ता अन्य कुणाकडे तरी सोपवून कार्यमुक्त होऊ शकतात. रशियन राष्ट्रपती पार्किसन्सने ग्रस्त असून, हल्लीच्या छायाचित्रांमधून त्यांच्यामध्ये आजाराची लक्षणे दिसत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

हल्लीच एका व्हिडिओमध्ये पुतिन हे आपल्या पायांची हालचाल इकडून तिकडे करताना दिसून आले होते. द सनच्या तज्ज्ञांच्या मते रशियन राष्ट्रपती वेदनेने पीडित होते. रशियाचे खासदार पुतिन यांना फौजदारी कारवाईपासून आजन्म सूट देण्यासंबंधीचे विधेयक संसदेत दाखल करण्याचा विचार करत असतानाचा पुतिन यांच्या राजीनाम्याचा वावड्या उठल्या आहेत.

हे नवे विधेयक स्वत: पुतीन यांनी सादर केले होते. या विधेयकानुसार पुतिन जिवंत असेपर्यंत त्यांना कायदेशीर कारवाईपासून सूट दिली जाईल. तसेच सरकारकडून त्यांना सर्व सवलती दिल्या जातील. रशियाची सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या आरटीनुसार हे विधेयक म्हणजे सत्तेच्या हस्तांतरणाचे संकेत आहेत. पुतीन यांना पार्किंसन्स आजार असल्याची शक्यता पहिल्यांदाच वर्तवण्यात आलेली नाही. दरम्यान, सोलोवेई यांनी सांगितले की, लवकरच एक नवा पंतप्रधान नियुक्त केला जाईल. त्याला पुतिन यांच्या संरक्षणाखाली प्रशिक्षित केले जाईल.

Web Title: Vladimir Putin is battling a serious illness, may resign at the request of his girlfriend?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.