व्लादिमीर पुतिन यांचा युक्रेनला मोठा धक्का, संपूर्ण जगावर होणार परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 12:56 AM2023-07-18T00:56:38+5:302023-07-18T00:57:55+5:30
महत्वाचे म्हणजे, अन्नधान्याच्या जागतिक किमती 20 टक्क्यांनी कमी ठेवण्यास या करारामुळे मदत झाली होती. यादृष्टीनेही हा करार महत्वाचा होता. रशिया आणि युक्रेने मोठ्या प्रमाणावर गव्हाची निर्यात करतात.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच रशिचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी यूक्रेनला एक मोठा धक्कादिला आहे. रशिया युक्रेनला काळ्या समुद्रातून अन्नधान्याच्या निर्यातीची परवानगी देणाऱ्या करारापासून बाहेर झाला आहे. आपण संयुक्त राष्ट्राच्या मध्यस्तीने झालेल्या ब्लॅक सी करारातून बाहेर पडत आहोत. कारण आपल्या अटी पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत, अशी घोषणा रशियाने सोमवारी केली.
महत्वाचे म्हणजे, अन्नधान्याच्या जागतिक किमती 20 टक्क्यांनी कमी ठेवण्यास या करारामुळे मदत झाली होती. यादृष्टीनेही हा करार महत्वाचा होता. रशिया आणि युक्रेने मोठ्या प्रमाणावर गव्हाची निर्यात करतात.
या घोषणेच्या काही तास आधी रशियाने, क्रिमियातील आपल्या पुलावर युक्रेनने हल्ला केल्याचे म्हटले होते. ऑक्टोबर 2022 मध्ये क्रिमियातील 19 किलोमीटर लांबीच्या पुलावर हल्ला झाला होता. काळा समुद्र आणि अझोव्ह समुद्र यांना जोडणारा क्रिमियन पूल रशियासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे.
युक्रेनच्या लष्कराने क्रिमिया ब्रीजवर हल्ला केल्याचा इन्कार केला होता. हा हल्ला रशियानेच केला असावा, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, काही महिन्यांनंतर, युक्रेनने क्रिमिया ब्रिजवरील हल्याच्या घटनेचा अप्रत्यक्षपणे स्वीकार केला होता. यानंतर, आता युक्रेनच्या माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने, यामागे युक्रेनची सुरक्षितता होती, असे म्हटले आहे.