नेपाळमध्ये चीनविरोधात संतापाचा उद्रेक, लोक रस्त्यावर उतरले; चिनी राजदूताचे फोटो जाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 10:53 AM2022-01-14T10:53:01+5:302022-01-14T10:54:16+5:30

anti-china protests in Nepal : देशभरात चीनविरोधात निदर्शने आयोजित करताना लोक रस्त्यावर उतरत आहेत. यापूर्वीही अशी आंदोलने झाली आहेत.

Voices against China continue to rise in Nepal; anti-China protests a daily affair | नेपाळमध्ये चीनविरोधात संतापाचा उद्रेक, लोक रस्त्यावर उतरले; चिनी राजदूताचे फोटो जाळले

नेपाळमध्ये चीनविरोधात संतापाचा उद्रेक, लोक रस्त्यावर उतरले; चिनी राजदूताचे फोटो जाळले

Next

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) चीनच्या (China) वाढत्या हस्तक्षेपाच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले आणि चीनचे राजदूत होउ यांकी  (Hou Yanqi) यांच्या फोटो जाळले. नेपाळच्या हिंदू नागरी समाजाने बुधवारी काठमांडू येथे 'राष्ट्रीय एकात्मता अभियाना'अंतर्गत देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाविरोधात निदर्शने केली. यावेळी संतप्त आंदोलकांनी चीनचे राजदूत होउ यांकी यांचे फोटो जाळले.

काठमांडूच्या रस्त्यावर जमलेल्या आंदोलकांनी चीनविरोधी घोषणा देत चीनच्या राजदूताने (Chinese Ambassador) नेपाळच्या अंतर्गत बाबींमध्ये विनाकारण हस्तक्षेप करण्याची सवय सोडावी. रासुवागडी तातोपाणी येथे अघोषित नाकेबंदी आणि राजनैतिक सीमा ओलांडल्याबद्दल आंदोलकांनी होउ यांकी यांच्यावर टीका केली. 

तसेच, आंदोलकांनी 'चीनी राजदूत यांकी परत जा' असे फलक हातात घेतले होते. या संघटनेने मंगळवारी जनकपूर येथील जनक चौकात चीनविरोधात निदर्शनेही केली. चीनने नेपाळमध्ये वादग्रस्त दृष्टिकोनासह राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक उपस्थिती वाढवत असल्याने नेपाळमध्ये त्याविरोधात संताप वाढत आहे. देशभरात चीनविरोधात निदर्शने आयोजित करताना लोक रस्त्यावर उतरत आहेत. यापूर्वीही अशी आंदोलने झाली आहेत.

चीनने नेपाळमध्ये आपल्या कारवाया वाढवल्या आहेत. नेपाळ सरकारच्या कामकाजात चीनच्या राजदूताचा हस्तक्षेप यापूर्वी अनेकदा समोर आला आहे. हाउ यांकी आणि नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची जवळीक कोणापासून लपलेली नाही. ओली यांनी चीनला नेपाळमध्ये पाय रोवण्यास मदत केल्याचे बोलले जाते. 

आता बहुतेक नेपाळी नागरिकांची इच्छा आहे की, चीनला मर्यादित ठेवले पाहिजे आणि त्याच्या राजदूताला अनावश्यक हस्तक्षेप करण्यापासून रोखले पाहिजे. याआधी स्वतंत्र नागरी समाजानेही चीनच्या कृत्यांविरोधात निदर्शने केल्याची माहिती आहे.

Web Title: Voices against China continue to rise in Nepal; anti-China protests a daily affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.