ब्राझीलमध्ये 3 दिवसांसाठी व्हॉट्सअॅपवर बंदी
By admin | Published: May 3, 2016 01:31 PM2016-05-03T13:31:26+5:302016-05-03T13:31:26+5:30
अमली पदार्थांच्या तस्करीचा तपास करण्यासाठी हवी असलेली माहिती पुरवण्याच्या बाबतीत व्हॉट्सअॅपने अलिप्ततेची भुमिका घेत नकार दिल्याने ही बंदी आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
ब्रासिलिया , दि. 03 - ब्राझीलमध्ये 72 तासांसाठी व्हॉट्सअॅपवर बंदी घालण्यात आली आहे. न्यायाधीशांनी सर्व मोबाईल सेवा पुरवणा-या टेलिकॉम कंपन्यांना तसे आदेशच दिले आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीचा तपास करण्यासाठी हवी असलेली माहिती पुरवण्याच्या बाबतीत व्हॉट्सअॅपने अलिप्ततेची भुमिका घेत नकार दिल्याने ही बंदी आली आहे.
फेसबुकने 2014 मध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतलं आहे. दोन व्यक्तींच्या दरम्यान झालेली संवाद - संदेशाची देवाण घेवाण सर्वस्वी गुप्त ठेवण्याच्या फेसबुकच्या पॉलिसीमुळे गुंता निर्माण होत आहे. कारण जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हाही आम्हाला व्हॉट्सअॅपचे संदेश उघड करता येणार नाहीत, अशी फेसबुकची भुमिका आहे. याने व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मोठा विस्तार झाला पण सार्वजनिक किंवा राष्ट्रीय हिताचा संकोच झाला आहे. याच भुमिकेतून न्यायालयाने बंदीचा आदेश दिला आहे.
अशाच प्रकारचा एक जुना संदर्भ अॅपलच्या बाबतीतही उपलब्ध आहे. दहशतवाद्यांनी परस्परांशी केलेले संवाद उघड करण्यास अॅपलने नकार दिला होता. आम्ही अशा पद्धतीनं ग्राहकाच्या संभाषणात डोकावणार नाही याची हमी दिल्याचे कारण अॅपलने पुढे केले होते.