इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानं सुनामीचा कहर, 168 लोकांचा मृत्यू, 600 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 07:53 AM2018-12-23T07:53:13+5:302018-12-23T12:52:02+5:30
इंडोनेशियामध्ये पुन्हा एकदा सुनामी आली आहे.
जकार्ता- इंडोनेशियामध्ये पुन्हा एकदा सुनामी आली आहे. या सुनामीममध्ये आतापर्यंत 168 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 600हून अधिक जण जखमी आहेत. इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंच ही सुनामी आल्याची माहिती इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. जावाचा दक्षिणी भाग आणि दक्षिणी सुमात्राच्या किनाऱ्यावरील आलेल्या या सुनामीनं डझनांहून अधिक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत. ही सुनामी स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री 9.30 वाजता आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते सुतोपो पूर्वो नुग्रोहो यांनी दिली आहे.
या सुनामीमध्ये आतापर्यंत 168 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 600हून अधिक लोक जखमी आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं समुद्राच्या आत भूस्खलन झालं आणि लाटा मोठ्या प्रमाणात उसळल्या. त्यानंतर या लाटांनी सुनामीचं स्वरूप धारण केलं. इंडोनेशियातील भूवैज्ञानिकांनी या सुनामीच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही नुग्रोहो यांनी व्यक्त केली आहे. अनक क्रॅकटो हे छोटं ज्वालामुखीचं बेट आहे. 1883मध्ये क्रॅकटो ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे हे बेट अस्तित्वात आलं.
BREAKING: Indonesia's disaster agency says death toll from tsunami rises to 40 with some 600 injured.
— The Associated Press (@AP) December 23, 2018
इंडोनेशियाला याआधीही बसला होता सुनामीचा फटका
गेल्या काही दिवसांपूर्वीही इंडोनेशियाला अशाच भूकंपाचा जोरदार धक्का बसून त्यापाठोपाठ सुनामी आली होती. त्या सुनामीमुळे इंडोनेशियामध्ये 1763 जणांचा मृत्यू झाला होता. अनेक लोक बेपत्ता होते. सुलावेसी बेट परिसरात 28 सप्टेंबर रोजी 7.5 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला व सुनामीचेही संकट ओढावले. याचा मोठा फटका पालू-पेटोबो व बालारोआ या दोन भागांना बसला. तेथील इमारती कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली कित्येक लोक दबले गेले होते. त्यातील अनेकांची बचावपथकांनी सुखरूप सुटका केली; परंतु तरीही अद्याप पाच हजार जण बेपत्ता होते.
राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पुरवो नुग्रोहो यांनी सांगितले होते की, कोसळलेल्या इमारतींच्या ढिगा-यांखाली अद्यापही अडकून पडलेल्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. त्यात ज्या व्यक्तींचा शोध लागणार नाही त्यांना बेपत्ता किंवा मृत म्हणून जाहीर केले जाईल. पालू येथील पेटोबो या गावामध्ये भूकंप-त्सुनामीने खूपच नुकसान झाले होते.
The Latest: Death toll rises to 43, with some 600 injured, in Indonesia tsunami apparently spawned by undersea landslides from volcanic eruption. https://t.co/hW1HJqyeqw
— The Associated Press (@AP) December 23, 2018