देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 07:36 AM2024-10-18T07:36:44+5:302024-10-18T07:37:35+5:30
मी भावी पिढीच्या नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करत असून राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ बायडेन व प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळपेक्षा वेगळा असेल, असा दावा हॅरिस यांनी केला.
वॉशिंग्टन : देशाला प्रथमस्थानी ठेवण्याचे आवाहन डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी रिपब्लिकन पक्षांच्या समर्थकांना व मतदारांना केले. वॉशिंग्टन येथे आयोजित प्रसारसभेला संबोधित करताना त्या बोलत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला रिपब्लिक पक्षाचे १०० हून माजी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढल्या महिन्यात होत असलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देशभक्त नागरिकांचे पहिले प्राधान्य डेमोक्रॅटिक पक्ष असेल. डोनाल्ड ट्रम्प एक अस्थिर व्यक्ती असून ते जर दुसऱ्यांदा देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले, तर लोकशाही मूल्य नष्ट होतील. त्यामुळे अमेरिकेला या इशाऱ्याबद्दल गांभीर्याने विचार करावा लागेल, असे नमूद करत हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली.
मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते
मी भावी पिढीच्या नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करत असून राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ बायडेन व प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळपेक्षा वेगळा असेल, असा दावा हॅरिस यांनी केला.