‘युनो’च्या ठरावातील तरतुदीविरुद्ध मतदान

By admin | Published: December 4, 2014 01:02 AM2014-12-04T01:02:29+5:302014-12-04T01:02:29+5:30

भारताने अमेरिका व पाकिस्तानसह संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) अण्वस्त्रविषयक ठरावातील एका तरतुदीच्या विरोधात मतदान केले.

Voting against UNO's resolution | ‘युनो’च्या ठरावातील तरतुदीविरुद्ध मतदान

‘युनो’च्या ठरावातील तरतुदीविरुद्ध मतदान

Next

संयुक्त राष्ट्रसंघ : भारताने अमेरिका व पाकिस्तानसह संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) अण्वस्त्रविषयक ठरावातील एका तरतुदीच्या विरोधात मतदान केले. कोणत्याही अटीविना अण्वस्त्ररहित राष्ट्र म्हणून त्वरित अण्वस्त्र प्रसारबंदी करार स्वीकारून आपली सर्व अणुप्रतिष्ठाने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (आयएईए) निगराणीखाली आणण्याचे आवाहन या तरतुदीत करण्यात आलेले आहे.
अण्वस्त्रमुक्त जगाचे उद्दिष्ट साध्य करणे आणि नि:शस्त्रीकरणाबाबतची बांधिलकी कृतीत उतरविण्यास गती देण्याविषयीचा ठराव आमसभेत मंगळवारी १६९ विरुद्ध सात मतांनी पारित करण्यात आला. (वृत्तसंस्था)


 

Web Title: Voting against UNO's resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.