ब्रेक्झिट प्रक्रियेसाठी ब्रिटनच्या संसदेत मतदान
By admin | Published: February 3, 2017 12:53 AM2017-02-03T00:53:04+5:302017-02-03T01:50:44+5:30
ब्रिटनमधील संसद सदस्यांनी बे्रक्झिट प्रक्रिया सुरु करण्यास मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. यूरोपीय संघातून ब्रिटनने बाहेर पडण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
लंडन : ब्रिटनमधील संसद सदस्यांनी ब्रेक्झिट प्रक्रिया सुरु करण्यास मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. यूरोपीय संघातून ब्रिटनने बाहेर पडण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
हाऊस आॅफ कॉमन्सच्या सदस्यांनी हे विधेयक पुढे नेण्यासाठी ११४ च्या तुलनेत ४९८ मतदान केले. यूरोपीय संघ सोडण्यासाठी व लिस्बन कराराच्या कलम ५० ची अंमलबजावणी करण्यास हे विधेयक ब्रिटनच्या पंतप्रधान टेरीजा मे यांना अधिकार देणार आहे. कॉमन्स आणि हाऊस आॅफ लॉर्डसमध्ये समीक्षेनंतर या विधेयकाचा कायदा बनणार आहे. यापूर्वी टेरीजा मे यांनी स्पष्ट केले होते की, ब्रेक्झिट धोरणावर लवकरच एक श्वेतपत्रिका सादर करण्यात येईल.
संसद सदस्य मारिया मिलर यांच्या प्रश्नाच्या उत्तरात टेरीजा मे यांनी हाउस आॅफ कॉमन्समध्ये सांगितले की, मी या सभागृहाला सूचित करु इच्छिते की, श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यात येईल.
विधेयकाच्या समर्थनार्थ व्हिप, पण कोणीच पालन करणार नाही
- ब्रिटनचे विदेश मंत्री बोरिस जॉन्सन यांनी मतदानानंतर व्टिट केले की, इतिहास रचला गेला आहे. लिबरल डेमोक्रेट आणि स्कॉटिश नॅशनल पार्टीच्या नेत्यांनी या विधेयकाच्या विरुद्ध मतदान केल्यानंतरही सरकार जिंकण्याची शक्यता होतीच.
- लेबर पार्टीचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ संसद सदस्यांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला होता. अर्थात, भारतीय वंशाचे संसद सदस्य वीरेंद्र शर्मा यांच्यासह लेबर पार्टीच्या अनेक सदस्यांनी असा संकेत दिला होता की, ते व्हिपचे पालन करणार नाहीत.