चक्क एका विद्यार्थिनीसाठी रेल्वेचा थांबा..
By Admin | Published: January 11, 2016 09:26 PM2016-01-11T21:26:21+5:302016-01-12T13:01:45+5:30
जपान रेल्वेने एका प्रवाशासाठी रेल्वेचा थांबा केला आहे. जपान मधील अतिशय दूरस्थ ठिकाणी असलेले होक्काइदो जवळील उत्तर बेटावरील कामी-शिर्टीकी (Kami-Shirataki) रेल्वे स्टेशनवर चक्क एका
ऑनलाइन लोकमत
होक्काइदो(जपान), दि. ११ - जपान रेल्वेने एका प्रवाशासाठी रेल्वेचा थांबा केला आहे. जपान मधील अतिशय दूरस्थ ठिकाणी असलेले होक्काइदो जवळील उत्तर बेटावरील कामी-शिर्टीकी (Kami-Shirataki) रेल्वे स्टेशनवर चक्क एका शाळेतील मुलीसाठी रेल्वे रोज थांबत असल्याची बातमी आहे. ही बातमी स्थानिक माध्यामात (सीसीटीव्ही) फिरत आहे. यामुळे जपान रेल्वेवर सोशल मिडीयाच्या माध्यामातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारतासारख्या देशात दररोज रेल्वे प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या अगनीत आहे, पण एका प्रवासासाठीचा रेल्वेचा थांबा कदाचित अशक्य आहे. खरं तर, गाडी एका प्रवासी थांबते हो विचित्र वाटतं पण जपान मध्ये कामी-शिर्टीकी स्टेशनवर एका मुली साठी स्थानक खुले आहे. सीसीटीव्हीच्या बातम्यानुसार हे वृत्त आहे.
गेल्या ३ वर्षापासून महाविद्यालयात शिकणारी ती मुलगी साकाळी ७ वा ४ मिनिटाची गाडी पकडते आणि येताना सांयकाळी ५ वा. ८ मिनिटाच्या गाडीने शाळेतून माघारी परतते.
सीसीटीव्हीने दिलेल्या माहीतीनुसार महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीची पदवी मार्च २०१६ पर्यंत संपेल आणि त्यानंतर स्टेशन बंद करण्यात येणार आहे.