अमेरिकेला आली जाग; व्यापक बंदूक नियंत्रण विधेयक मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 08:45 AM2022-06-10T08:45:29+5:302022-06-10T08:45:39+5:30

अर्ध-स्वयंचलित रायफल खरेदी करण्यासाठी वयोमर्यादा वाढविण्याची तसेच १५ गोळ्यांपेक्षा जास्त क्षमतेच्या मॅगजिनच्या विक्रीवर निर्बंध घालण्याची तरतूद त्यात आहे.

Wake up to America; Extensive gun control bill passed | अमेरिकेला आली जाग; व्यापक बंदूक नियंत्रण विधेयक मंजूर

अमेरिकेला आली जाग; व्यापक बंदूक नियंत्रण विधेयक मंजूर

Next

वॉशिंग्टन : बफेलो, न्यूयॉर्क व टेक्सासमध्ये अलीकडेच झालेल्या गोळीबाराच्या घटनांनंतर अमेरिकी संसदेने बुधवारी व्यापक बंदूक नियंत्रण विधेयक मंजूर केले. 

अर्ध-स्वयंचलित रायफल खरेदी करण्यासाठी वयोमर्यादा वाढविण्याची तसेच १५ गोळ्यांपेक्षा जास्त क्षमतेच्या मॅगजिनच्या विक्रीवर निर्बंध घालण्याची तरतूद त्यात आहे. हे विधेयक कायद्यात रूपांतरित होण्याची शक्यता धूसर आहे; कारण सिनेटचे लक्ष मानसिक आरोग्य कार्यक्रमांत सुधारणा, सामाजिक सुरक्षा मजबूत करणे व पार्श्वभूमीचा तपास वाढविण्यावर आहे.

परंतु या विधेयकामुळे डेमोक्रेटिक खासदारांना नोव्हेंबरमध्ये धोरण तयार करण्याची संधी मिळणार आहे. समितीने अलीकडेच झालेल्या गोळीबारातील पीडित व कुटुंबातील सदस्यांच्या साक्षीनंतर विधेयकाला मंजुरी दिली. 

Web Title: Wake up to America; Extensive gun control bill passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.