बूट घालून चाला; वीजनिर्मिती करा!

By Admin | Published: January 18, 2015 01:54 AM2015-01-18T01:54:29+5:302015-01-18T01:54:29+5:30

आता तुम्ही चालत-चालतही वीज तयार करू शकता. होय, जर्मन शास्त्रज्ञांनी हे वास्तवात उतरवले आहे. विज्ञान नियतकालिक ‘स्मार्ट मटेरिअल्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स’मध्ये यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध झाले.

Walk and walk; Generate electricity! | बूट घालून चाला; वीजनिर्मिती करा!

बूट घालून चाला; वीजनिर्मिती करा!

googlenewsNext

लंडन : आता तुम्ही चालत-चालतही वीज तयार करू शकता. होय, जर्मन शास्त्रज्ञांनी हे वास्तवात उतरवले आहे. विज्ञान नियतकालिक ‘स्मार्ट मटेरिअल्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स’मध्ये यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध झाले.
संशोधनाच्या मते, बुटाच्या आकाराचे एक उपकरण तयार करण्यात आले असून याचा वापर करून चालल्यास विजेची निर्मिती होते. याद्वारे तीन ते चार मिलिवॅट एवढी वीज तयार केली जाऊ शकते. एवढ्या विजेने स्मार्टफोनची बॅटरीही चार्ज होऊ शकत नाही; मात्र छोटे सेन्सर व बॅटऱ्या यासाठी खूप लाभदायी आहे. (वृत्तसंस्था)

चालणे गरजेचे
संशोधकांनी वृद्धांच्या बुटाच्या दोऱ्या आपोआप बांधल्या जाव्यात यासाठीही प्रयत्न केले. बुटात पाय केव्हा घालण्यात आला हे जाणून घेऊन तो स्वत:हून दोऱ्या बांधेल. या आगळ्या-वेगळ्या उपकरणाचे दोन भाग आहेत. टाच जमिनीवर पडताच ‘शॉक हार्वेस्टर’ वीजनिर्मिती होईल. चालण्याची क्रिया सुरू असेल तेव्हा दुसरे उपकरण ‘स्विंग हार्वेस्टर’ वीज तयार करील.

Web Title: Walk and walk; Generate electricity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.