दुहीची भिंत पडल्याचा जल्लोष
By admin | Published: November 10, 2014 02:09 AM2014-11-10T02:09:04+5:302014-11-10T02:09:04+5:30
जर्मनीतील बर्लिन भिंत पडल्याचा २५ वा स्मृती दिन साजरा होत असून, त्यानिमित्त संगीत मैफली, प्रदर्शने यांचे आयोजन करण्यात आले आहे.
बर्लिन : जर्मनीतील बर्लिन भिंत पडल्याचा २५ वा स्मृती दिन साजरा होत असून, त्यानिमित्त संगीत मैफली, प्रदर्शने यांचे आयोजन करण्यात आले आहे. कम्युनिस्ट पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत जाण्याच्या प्रयत्नात मरण पावलेल्या नागरिकांना चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली असून, ब्रँडेनबर्ग गेट येथे भव्य खुली मेजवानीही आयोजित करण्यात आली आहे. पांढऱ्या शुभ्र फुग्यांची भिंतीच्या लांबीची मालिका तयार करण्यात आली असून, भिंत पाडल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे फुगे आकाशात सोडण्यात आले.
पूर्व जर्मनीतील लोकांना पश्चिम जर्मनीत जाताना रोखण्यासाठी ही भिंत १९६१ साली उभारण्यात आली होती. ती अमेरिका व रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपल्यानंतर १९८९ साली पाडण्यात आली. (वृत्तसंस्था)