अमेरिका आणि जगाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत - तालिबान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 01:48 PM2021-08-31T13:48:51+5:302021-08-31T13:50:58+5:30
afghanistan crisis : अमेरिकन सैन्याच्या शेवटच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काबूलच्या रस्त्यांवर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आपला आनंद साजरा केला.
२० वर्षांनंतर अखेर अमेरिकेने अफगाणिस्तान सोडले. सोमवारी रात्री उशिरा अमेरिकेचे शेवटचे विमान काबूल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर तालिबान्यांनी आनंद साजरा केला आहे. अमेरिकी सैन्य पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर तालिबाननेअफगाणिस्तानला स्वतंत्र झालेला देश घोषित केले. तसेच, तालिबानने अमेरिका आणि इतर देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Want good relations with the US and world, say Taliban as America pulls out of Afghanistan after 20 years)
अमेरिकन सैन्याच्या शेवटच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काबूलच्या रस्त्यांवर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आपला आनंद साजरा केला. तसेच, तालिबानने काबूल विमानतळ ताब्यात घेतले आणि अफगाणी नागरिकांचे त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले, "अफगाणिस्तानचे अभिनंदन … हा विजय आपल्या सर्वांचा आहे. आम्हाला अमेरिका आणि जगाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. आम्ही त्या सर्वांशी चांगल्या राजनैतिक संबंधांचे स्वागत करतो."
(अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबान्यांकडून हवेत गोळीबार करत आनंद साजरा)
अमेरिकन सैनिक बाहेर पडल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य असलेला देश घोषित केला आहे. २० वर्षे चाललेल्या प्रदीर्घ युद्धानंतर अखेर अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतले आहे. अमेरिका परत गेल्यामुळे तालिबान खूप आनंदी आहे. अफगाणिस्तान आता पूर्णपणे मुक्त झाला आहे आणि स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहे, असे तालिबानने म्हटले आहे.
"The last American soldier to leave Afghanistan- Major General Chris Donahue, boarded C-17 aircraft on August 30, marking the end of US mission in Kabul," tweets US Department of Defense pic.twitter.com/nScjl4Hfao
— ANI (@ANI) August 31, 2021
बायडेन यांनी आपल्या सैन्याचे आभार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर भाष्य केले. जो बायडेन यांनी आपले सैन्य खतरनाक मोहिमेवरून परतण्यावर आभार मानले आहेत. ते म्हणाले की, गेल्या १७ दिवसांत आमच्या सैन्याने आजवरच्या अमेरिकी इतिहासातील सर्वात मोठे एअरलिफ्ट केले. आम्ही १.२ लाखांहून अधिक अमेरिकी नागरिक, सहकारी देशांचे नागरिक आणि अफगाण नागरिकांना बाहेर काढले.