गाझा रिकामे करायचेय...! डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन, गाझाच्या लोकांची कुठे सोय करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:24 IST2025-01-28T17:23:34+5:302025-01-28T17:24:16+5:30
गाझात परतत असलेल्या लोकांना पुन्हा गाझाबाहेर करण्याचा विचार ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. या लोकांनी शांतता, हिंसामुक्त राहण्यासाठी गाझाबाहेर रहावे, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.

गाझा रिकामे करायचेय...! डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन, गाझाच्या लोकांची कुठे सोय करणार
ज्या अमेरिकेच्या शस्त्रांच्या जिवावर इस्रायलने गाझा पट्टीची चाळण केली त्या गाझामध्ये आता लोक परतू लागले आहेत. या लोकांकडे पुन्हा घर उभारणीचे पैसे तर नाहीत परंतू, आपल्या घराची हालत पाहण्यासाठी हे लोक धडपडू लागले आहेत. इस्रायल-हमासमध्ये युद्धबंदी झालेली आहे. हे लोक गाझात परतत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य आले आहे.
गाझात परतत असलेल्या लोकांना पुन्हा गाझाबाहेर करण्याचा विचार ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. या लोकांनी शांतता, हिंसामुक्त राहण्यासाठी गाझाबाहेर रहावे, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.
इस्रायलला अमेरिकेतूनच शस्त्रास्त्रे मिळत होती. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन एका मागोमाग एक इस्रायल आणि युक्रेनला करोडो डॉलर्सचे पॅकेज जारी करत होते. यातून अमेरिकेची शस्त्रास्त्रे या दोन्ही देशांना पुरविली जात होती. गाझाच्या या परिस्थितीमागे कुठे ना कुठे अमेरिकेचाही हात आहे. आता अमेरिका या गाझावासियांना त्यांच्या हक्काच्या भागातूनच बाहेर काढण्याची तयारी करत आहे.
जेव्हा आपण गाझापट्टीकडे पाहतो तेव्हा असे वाटते की ती कित्येक वर्षांपासून नरकासारखी आहे. या जमिनीवर अनेक मानवजाती राहिल्या आहेत. हे काही आताच सुरु झालेला नाही. याची सुरुवात हजारो वर्षांपूर्वी झाली होती व नेहमी हिंसाचार याच्याशी जोडलेला आहे. आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकतो जे याच्यापेक्षा आरामदायी आणि सुरक्षित असतील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या लोकांना जॉर्डन आणि इजिप्तने येऊन घेऊन जावे. आपण त्या पूर्ण जागेला रिकामे करू, असे आवाहन ट्रम्प यांनी केले होते.
संयुक्त राष्ट्रांनुसार गाझातील ९० टक्के लोक आता विस्थापित झाले आहेत. काही लोकांना तर १० पेक्षाही अधिक वेळा विस्थापित व्हाले लागले आहे. ट्रम्प यांनी जॉर्डन आणि इजिप्तच्या राष्ट्र प्रमुखांशी चर्चा झाली आहे. आता हे दोन्ही देश ट्रम्प यांच्या या प्लॅनबाबत काय भूमिका घेतात, यावर या गोष्टी अवलंबून असणार आहेत.