युद्ध नव्हे, चर्चेच्या माध्यमातून सुटेल काश्मीर प्रश्न - इम्रान खान 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 09:27 AM2018-12-04T09:27:37+5:302018-12-04T09:28:47+5:30

युद्ध नव्हे तर चर्चेच्या माध्यमातून काश्मीर प्रश्न सुटेल, अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे

War is not the option to resolve kashmir issue- Imran Khan | युद्ध नव्हे, चर्चेच्या माध्यमातून सुटेल काश्मीर प्रश्न - इम्रान खान 

युद्ध नव्हे, चर्चेच्या माध्यमातून सुटेल काश्मीर प्रश्न - इम्रान खान 

googlenewsNext
ठळक मुद्दे युद्ध नव्हे तर चर्चेच्या माध्यमातून काश्मीर प्रश्न सुटेल, अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहेकाश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी दोन ते तीन पर्यायांवर चर्चा झाली आहे. मात्र याविषयी एवढ्यात चर्चा करणे घाईचे ठरेलअण्वस्त्रसंपन्न असलेलेल दोन देश युद्ध करू शकत नाही. कारण याचा परिणाम धोकादायक ठरू शकतो

इस्लामाबाद - भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य झाल्यापासूनच काश्मीर प्रश्न हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. काश्मीरवरून दोन्ही देशांमध्ये युद्धेही झाली. अनेक दशके उलटल्यानंतरही काश्मीर प्रश्न सुटू शकलेला नाही. मात्र आता युद्ध नव्हे तर चर्चेच्या माध्यमातून काश्मीर प्रश्न सुटेल, अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे. 

सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्नाबाबत भाष्य केले. ''युद्ध नव्हे तर चर्चेच्या माध्यमातून काश्मीर प्रश्न सोडवता येईल. जोपर्यंत चर्चेला सुरुवात होत नाही, तोपर्यंत काश्मीर प्रश्न सोडवण्याबाबतच्या कुठल्याही पर्यायावर चर्चा करता येणार नाही.'' असे ते म्हणाले. ''काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी दोन ते तीन पर्यायांवर चर्चा झाली आहे. मात्र याविषयी एवढ्यात चर्चा करणे घाईचे ठरेल, ''असे सांगत त्यांनी याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही युद्धाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. ''अण्वस्त्रसंपन्न असलेलेल दोन देश युद्ध करू शकत नाही. कारण याचा परिणाम धोकादायक ठरू शकतो." असे इम्रान खान म्हणाले. भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान गंभीरपणे विचार करत आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि त्यांच्या सरकारचीही हीच भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: War is not the option to resolve kashmir issue- Imran Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.