युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 06:15 AM2024-10-12T06:15:27+5:302024-10-12T06:17:06+5:30

मोदी म्हणाले की, मी बुद्धाच्या भूमीतून आलो आहे आणि मी वारंवार सांगितले आहे की, हे युद्धाचे युग नाही.

war will not solve problems said pm narendra modi | युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी

युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी

व्हिएन्टिन (लाओस) : जगातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांमुळे सर्वाधिक नकारात्मक परिणाम झालेल्या देशांमध्ये ‘ग्लोबल साउथ’चे देश येतात. युरेशिया आणि पश्चिम आशियात शक्य तितक्या लवकर शांतता व स्थिरता पुनर्स्थापित करावी, समस्यांचे निराकरण रणांगणात होऊ शकत नाही, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. १९ व्या आसियान परिषदेत ते बोलत होते. 

मोदी म्हणाले...

मी बुद्धाच्या भूमीतून आलो आहे आणि मी वारंवार सांगितले आहे की, हे युद्धाचे युग नाही. आम्ही म्यानमारमधील परिस्थितीबाबत आसियानच्या दृष्टिकोनाचे समर्थन करतो,  शेजारी देश या नात्याने भारत आपली जबाबदारी पार पाडत राहील. मानवतावादी दृष्टीकोन ठेवून आपण संवाद आणि मुत्सद्देगिरीवर अधिक भर दिला पाहिजे. 

 

Web Title: war will not solve problems said pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.