२ वाहने अन् ६ जण; हरदीप सिंग निज्जरवर डागल्या ५० गोळ्या, शीख पेहरावात होते हल्लेखोर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 05:49 PM2023-09-26T17:49:53+5:302023-09-26T17:51:53+5:30

Hardeep Singh Nijjar Case: हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे.

washington post reveals report that khalistani terrorist hardeep singh nijjar murder case at least six man and two cars were involved hit 34 bullets | २ वाहने अन् ६ जण; हरदीप सिंग निज्जरवर डागल्या ५० गोळ्या, शीख पेहरावात होते हल्लेखोर!

२ वाहने अन् ६ जण; हरदीप सिंग निज्जरवर डागल्या ५० गोळ्या, शीख पेहरावात होते हल्लेखोर!

googlenewsNext

Hardeep Singh Nijjar Case: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या मृत्यूमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. अमेरिकेने कॅनडाची बाजू घेतली असून, जपान, श्रीलंका, बांगलादेश यांनी भारताचे समर्थन केले आहे. मात्र, यातच आता अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टने हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येबाबत एक रिपोर्ट जाहीर केला असून, यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

अमेरिकास्थित वर्तमानपत्र वॉशिंग्टन पोस्टने घटनास्थळावरी ९० सेकंदाच्या व्हिडीओवरून ही घटना कशी घडली, याबाबतचा घटनाक्रम सांगितला आहे. कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर पार्किंग क्षेत्रात १८ जून रोजी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची हत्या करण्यात आली. यावेळी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबाराचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले. वॉशिंग्टन पोस्ट आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येत किमान सहा जण आहेत. 

निज्जरवर जवळपास ५० गोळ्या झाडण्यात आल्या 

घटनाक्रम असा की, पार्किंगमध्ये निज्जरचा पिकअप ट्रक होता. तसेच तिथे एक सेडान गाडी उभी होती. पिकअप ट्रक पार्किंगमधून बाहेर पडत असताना सेडान गाडी पिकअपच्या समांतर बाजूला आली. त्यानंतर, सेडान गाडी पिअकपला ओव्हरटेक करून पुढे गेली आणि पिकअपच्या समोर येऊन थांबली. यावेळी सेडान गाडीतून दोघेजण उतरले आणि पिकअप ट्रकच्या चालकावर त्यांनी बंदूक रोखली. निज्जरवर जवळपास ५० गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी ३४ गोळ्या त्याला लागल्या. वाहनाच्या काचा फुटल्या. जमिनीवर बंदुकीच्या गोळ्या पडल्या होत्या. यावेळी गुरुद्वारातील एक अधिकारी गुरुमीत सिंह तूर यांनी निज्जर याला पिकअप ट्रकमध्ये बसवून हल्लेखोरांचा पाठलाग केला, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. दुसरीकडे, सदर हल्लेखोर शीख पेहरावात होते, असेही सांगितले जात आहे.

दरम्यान, निज्जरच्या हत्येचा तपास कोण करणार, यावरून सरे पोलीस आणि आरसीएमपी पोलीस यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला उशीर झाला असंही काही स्थानिकांचे म्हणणे आहे, असे वॉशिंग्टन पोस्ट यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: washington post reveals report that khalistani terrorist hardeep singh nijjar murder case at least six man and two cars were involved hit 34 bullets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.