दुष्काळावर मात करण्यासाठी हवेतील बाष्पातून पाणी जमा, युरोपातील अनोखा प्रयोग, जंगलातील हिरवाई टिकविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 10:01 AM2022-08-30T10:01:00+5:302022-08-30T10:01:25+5:30

International News: प्रचंड उष्म्यामुळे स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल या देशांतील विशाल जंगलांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. युरोप, ब्रिटनमधील दुष्काळामुळे हजारो एकर जमिनीचे वाळवंटात रूपांतर होण्याची भीती आहे.

Water accumulation from air vapor to overcome drought, a unique experiment in Europe, | दुष्काळावर मात करण्यासाठी हवेतील बाष्पातून पाणी जमा, युरोपातील अनोखा प्रयोग, जंगलातील हिरवाई टिकविण्याचा प्रयत्न

दुष्काळावर मात करण्यासाठी हवेतील बाष्पातून पाणी जमा, युरोपातील अनोखा प्रयोग, जंगलातील हिरवाई टिकविण्याचा प्रयत्न

googlenewsNext

लिस्बन : प्रचंड उष्म्यामुळे स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल या देशांतील विशाल जंगलांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. युरोप, ब्रिटनमधील दुष्काळामुळे हजारो एकर जमिनीचे वाळवंटात रूपांतर होण्याची भीती आहे. त्यामुळे पोर्तुगाल, स्पेनसारख्या काही देशांत धुक्याच्या वेळी हवेतून बाष्प जमा करून त्यातील पाणी जंगलातील हिरवाई टिकविण्यासाठी सध्या वापरणे सुरू आहे.

युरोपीय महासंघात लाइफ निब्लस या योजनेद्वारे स्पेनमधील कॅनरी बेटातील ग्रेन कॅनरिया तसेच पोर्तुगाल येथे धुके व हवेतील बाष्प जमा केले जाते. धुक्याच्या वेळी जमिनीवर उभारलेल्या चौकोनी जाळीतून हवा प्रवाहित होते. तिच्यातील बाष्पामुळे पाण्याचा अंश जाळीवर जमा होतो. ते पाणी जाळीखाली असलेल्या कंटेनरमध्ये साठविण्यात येते. अशा प्रयोगासाठी गडद धुके व थोडी वेगाने वाहणारी हवा यांची आवश्यकता असते. ते वातावरण कॅनरी, पोर्तुगाल येथे पाहायला मिळते. (वृत्तसंस्था)

बाष्पातून मिळविणार दोन लाख लिटर पाणी
ग्रीन कॅनरियातील डोरामारा वनक्षेत्रात ३५ हेक्टर जमिनीवर २५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी धुके व हवेतील बाष्पातून दोन लाख लिटर पाणी साठविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.  

हे आहेत हिरवाई वाढविण्याचे उपाय
ग्रेन कॅनरिया ते पोर्तुगाल या भागात ३१ फॉग वॉटर कलेक्टर बसविण्यात आले आहेत. ग्रेन कॅनरिया येथे धुक्यात हवेतील बाष्पाद्वारे ५४ हजार लिटर पाणी गेल्या काही दिवसांत जमा करण्यात आले आहे. जंगल टिकून राहावे, यासाठी १४ प्रकारची हजारो झाडे ग्रेन कॅनरिया ते पोर्तुगाल या भागात लावण्यात आली आहेत.

कोकुनचा आगळावेगळा प्रयोग
धुक्याच्या वेळी हवेतील बाष्पातून पाणी मिळविण्यासोबत कोकुनचा प्रयोग केला जात आहे. रोपट्याच्या भोवती रिसायकल कार्डबोर्डपासून बनविलेले कोकुनचे आच्छादन लावण्यात येते. कोकुनमध्ये २५ लीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. कोकुनवरील लेपनामुळे आतील पाण्याचे बाष्पीकरण होत नाही. तसेच गुरा-ढोरांपासून रोपट्याला संरक्षण मिळते व ते नीट वाढू शकते.

Web Title: Water accumulation from air vapor to overcome drought, a unique experiment in Europe,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.