ओरलँडो हत्याकांड आम्ही घडविले
By admin | Published: June 14, 2016 04:52 AM2016-06-14T04:52:15+5:302016-06-14T04:52:15+5:30
ओरलँडो येथील गे नाइट क्लब हत्याकांडाची जबाबदारी सोमवारी इसिसने घेतली आहे. हे हत्याकांड ‘इस्लामच्या सैनिकाने’ घडविल्याचे म्हटले.
बैरूत : ओरलँडो येथील गे नाइट क्लब हत्याकांडाची जबाबदारी सोमवारी इसिसने घेतली आहे. हे हत्याकांड ‘इस्लामच्या सैनिकाने’ घडविल्याचे म्हटले.
इस्लामच्या सैनिकांपैकी एकाला परमेश्वराने ओरलँडोच्या क्लबमध्ये हत्याकांड घडविण्यास परवानगी दिली, असे अल बयान रेडिओच्या बातमीपत्रात म्हटले. वृत्तसंस्था अमाकने रविवारी गे नाइट क्लबवरील हल्ला इस्लामिक स्टेटच्या सैनिकाने केल्याचे म्हटले होते. या हत्याकांडात ५० जण ठार व ५३ जण जखमी झाले. हल्लेखोर ओमर मतीनही यात ठार झाला. अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यांनंतरचे हे मोठे हत्याकांड ठरले आहे. (वृत्तसंस्था)
एकाला अटक
दक्षिण कॅरोलिनात तीन बंदुका व स्फोटकांची रसायने बाळगणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली. आपण ‘गे प्राइड परेड’कडे जात होतो, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. पश्चिम हॉलीवूडमध्ये दरवर्षी होणाऱ्या ‘गे प्राइड परेड’मध्ये (समलिंगी व्यक्तींची मिरवणूक) हजारो लोक सहभागी होतात. जेम्स वेस्ले हॉवेल (२०) असे या आरोपीचे नाव आहे.