'तुम्ही आमच्यावर जेवढे शुल्क लावाल, तेवढे आम्ही लादणार आहोत', डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 08:14 IST2024-12-18T08:12:09+5:302024-12-18T08:14:28+5:30

अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कर लादण्याचा इशारा दिला आहे.

We will impose whatever tariffs you impose on us Donald Trump warns India | 'तुम्ही आमच्यावर जेवढे शुल्क लावाल, तेवढे आम्ही लादणार आहोत', डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला इशारा

'तुम्ही आमच्यावर जेवढे शुल्क लावाल, तेवढे आम्ही लादणार आहोत', डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला इशारा

अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर परस्पर कर लादण्याचा इशारा दिला आहे. जर भारताने अमेरिकन उत्पादनांवर समान कर लावला तर आता ट्रम्प भारतीय उत्पादनांवरही तोच कर लावण्याची चर्चा करत आहेत. काही अमेरिकन उत्पादनांच्या आयातीवर भारताने लादलेल्या हाय टॅरिफ'च्या प्रत्युत्तरात परस्पर कर लावण्याची चर्चा केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प माध्यमांसोबत बोलताना म्हणाले, जर त्यांनी आमच्यावर कर लावला, तर आम्ही त्यांच्यावर समान कर लावू. ते आमच्यावर कर लावतात, जवळजवळ सर्व प्रकरणांमध्ये, ते आमच्यावर कर लावत आहेत आणि आम्ही त्यांच्यावर कर लावत नाही, असंही ते म्हणाले. 

रशियाच्या अण्वस्त्र प्रमुखाच्या हत्येची जबाबदारी युक्रेनने स्वीकारली, स्फोटात सहाय्यकही ठार!

ट्रम्प यांनी चीनसोबतच्या संभाव्य व्यापार करारावरील प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, काही देश जे अमेरिकन उत्पादनांवर उच्च शुल्क लावतात त्यात भारत आणि ब्राझीलचा समावेश आहे.

ट्रम्प म्हणाले, “रसिप्रोकल हा शब्द महत्त्वाचा आहे कारण जर कोणी आमच्यावर शुल्क आकारत असेल तर आम्हाला स्वतःबद्दल बोलण्याची गरज नाही - जर भारत आमच्याकडून १०० टक्के शुल्क आकारत असेल तर आम्ही त्यांना काही आकारू नये का? त्यांनी आम्हाला सायकल पाठवल्या आणि आम्ही देखील पाठवतो ते आमच्याकडून १००-२०० रुपये घेतात.

ट्रम्प म्हणाले, "भारत खूप शुल्क घेतो. ब्राझील खूप शुल्क घेते. जर त्यांना आमच्याकडून शुल्क आकारायचे असेल तर ते ठीक आहे, परंतु आम्ही त्यांच्याकडून तेच आकारणार आहोत. 

ट्रम्प यांचे कॉमर्स सेक्रेटरी हॉवर्ड लुटनिक यांनी सांगितले की, ट्रम्प प्रशासनात "रेसिप्रोसिटी" हा एक महत्त्वाचा विषय असेल. सोप्या शब्दात, जर देश-१ देश-२ वर कर लादत असेल, तर देश-२ त्यानुसार देश-१ वर कर लादू शकतो. त्या बदल्यात किती कर आकारावा लागतो हे देशावर अवलंबून असते. 

Web Title: We will impose whatever tariffs you impose on us Donald Trump warns India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.