भारत-चीनमध्ये सँडविच होणार नाही : श्रीलंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 10:12 IST2024-09-25T10:12:07+5:302024-09-25T10:12:21+5:30
कोणा एकासोबत राहणार नाही : दिसानायके

भारत-चीनमध्ये सँडविच होणार नाही : श्रीलंका
कोलंबो : ‘भारत आणि चीन यांच्यात सँडविच व्हायचे नाही. श्रीलंकेला वर्चस्वासाठी सुरू असलेल्या लढाईत अडकायचे नाही,’ अशी भूमिका श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुराकुमारा दिसानायके यांनी मांडली आहे.
भारत-चीन आमचे चांगले मित्र आहेत. भविष्यात आमची भागीदारी चांगली राहील. श्रीलंका हा दिवाळखोर देश आहे. देशाचे आर्थिक संकट दूर करणे हे माझे प्राधान्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हरिणी अमरसूर्या झाल्या नव्या पंतप्रधान
कोलंबो : हरिणी अमरसूर्या यांनी मंगळवारी श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यामुळे त्या २००० मध्ये सिरिमावो भंडारनायके यांच्यानंतर पंतप्रधानपद भूषवणाऱ्या दुसऱ्या महिला नेत्या ठरल्या.
५४ वर्षीय नेत्या अमरसूर्या यांना श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुराकुमारा दिसानायके यांनी शपथ दिली.