सुरक्षा धोक्यात आल्यास अण्वस्त्रे वापरू : व्लादिमीर पुतिन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 09:24 AM2023-06-18T09:24:55+5:302023-06-18T09:25:09+5:30

रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास या अण्वस्त्रांचा वापर केला जाईल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे.

We will use nuclear weapons if security is threatened: Vladimir Putin | सुरक्षा धोक्यात आल्यास अण्वस्त्रे वापरू : व्लादिमीर पुतिन

सुरक्षा धोक्यात आल्यास अण्वस्त्रे वापरू : व्लादिमीर पुतिन

googlenewsNext

सेंट पीटर्सबर्ग : बेलारूसमध्ये रशियाने अण्वस्त्रे तैनात केली आहेत. रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास या अण्वस्त्रांचा वापर केला जाईल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, नाटो देशांपेक्षा रशियाकडे अधिक अण्वस्त्रे आहेत. युद्धात युक्रेनचे सैन्य फार काळ तग धरू शकणार नाही.  कीव्हमधील कोणत्याही इमारतीवर आम्ही कधीही हल्ला चढवू शकतो; पण रशिया तसे करणार नाही. मॉस्को व बेलगोरोद येथे हल्ले करून युक्रेन 
आम्हाला चिथावण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही पुतिन यांनी केला.

आफ्रिकी देशांच्या अटी हास्यास्पद
आफ्रिकी देशांच्या नेत्यांनी युद्ध थांबविण्यासाठी सादर केलेल्या अटी हास्यास्पद आहेत, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले. क्रिमिया येथील राजकीय कैद्यांची मुक्तता करण्याची मागणी पुतिन यांच्याकडे करावी, असेही झेलेन्स्की म्हणाले.

Web Title: We will use nuclear weapons if security is threatened: Vladimir Putin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.