वॉशिंग्टनच्या एअरबेसवर शस्त्रधारी सापडलेच नाहीत
By Admin | Published: June 30, 2016 09:27 PM2016-06-30T21:27:23+5:302016-06-30T21:27:23+5:30
वॉशिंग्टन येथिल अँड्र्यूज एअरबेसवर शस्त्रधारी लपल्याच्या वृत्तानंतर तेथील एअरबेसच्या केलेल्या पाहणीनंतर तेथे कोणतेही शस्त्रधारी नसल्याचा खुलासा केला आहे.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ३० : वॉशिंग्टन येथिल अँड्र्यूज एअरबेसवर शस्त्रधारी लपल्याच्या वृत्तानंतर तेथील एअरबेसच्या केलेल्या पाहणीनंतर तेथे कोणतेही शस्त्रधारी नसल्याचा खुलासा केला आहे. तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेकडून घडविण्यात आलेल्या हल्ल्यासारखाच हल्ला अमेरिकेतही घडविला जाऊ शकतो, असा इशारा अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएचे संचालक जॉन ब्रेनन यांनी दिल्यानंतर वॉशिंग्टनच्या एअरबेसवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करुन योग्य ती पाहणी करण्यात आली.
इस्तंबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तिहेरी आत्मघाती हल्ल्यात ४१ ठार, तर २३९ जण जखमी झाले असून, मृतांत १८ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
#WATCH Visuals from US joint base Andrews in Maryland where an active shooter is confirmed, via ANI's FB Live feed: https://t.co/0N8gs4T6ml
— ANI (@ANI_news) June 30, 2016