आता रोबो करतोय ग्राहकांचे स्वागत

By admin | Published: April 20, 2015 11:58 PM2015-04-20T23:58:14+5:302015-04-20T23:58:14+5:30

ती स्मितहास्य करते, ती गाते आणि आता तर ती टोकिओतील एका मॉलमध्ये स्वागतासाठी उभी आहे. रोबो असणाऱ्या या स्वागतिकेचे वैशिष्ट्य असे की,

Welcome customers now roaming | आता रोबो करतोय ग्राहकांचे स्वागत

आता रोबो करतोय ग्राहकांचे स्वागत

Next

टोकिओ : ती स्मितहास्य करते, ती गाते आणि आता तर ती टोकिओतील एका मॉलमध्ये स्वागतासाठी उभी आहे. रोबो असणाऱ्या या स्वागतिकेचे वैशिष्ट्य असे की, कितीही वेळ काम केले तरीही ती थकत नाही. टोकिओच्या अप मार्केटमधील या दुकानात ती ग्राहकांचे सुहास्य वदनाने स्वागत करते. माय नेम इज चिहिराआयको, हाऊ डू यू डू? असे ती जपानी भाषेत म्हणते, मान हलवून गोड हास्य करणारी तिची मूर्ती जपानच्या मित्सुकोशी या जुन्या डिपार्टमेंट स्टोअरमध्ये उभी आहे.
चिहिराआयको हे जपानी महिलांचे लोकप्रिय नाव आहे. चिहिराचा पोशाखही जपानी किमोनो हा आहे. ग्राहक आला की तिचे गुलाबी ओठ उमलतात. आय अ‍ॅम चिहिरा...स्वागताचे शब्द उमटतात.
पारंपरिक स्वागतिका व चिहिरा यांच्यात फरक इतकाच की चिहीरा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. तिच्या रेकॉर्ड केलेल्या बोलण्याव्यतिरिक्त ती काहीच बोलू शकत नाही. पण तिची कांती मानवी आहे, तिच्या हालचाली मानवासारख्या (पूर्णपणे मानवी नव्हे) आहेत. मायक्रोवेव्हपासून ऊर्जानिर्मितीपर्यंत अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या तोशिबा या प्रसिद्ध कंपनीने हा मानवी रोबो तयार केला आहे. माणूस जे काम करतो, ते सर्व काम करणारा रोबो तयार करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे कंपनीचे प्रमुख तंत्रज्ञ हितोशी तोकुडा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Welcome customers now roaming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.