विविध पक्षी करतील माजी पंतप्रधानांचे नवीन घरात स्वागत

By admin | Published: May 25, 2014 11:45 PM2014-05-25T23:45:31+5:302014-05-25T23:45:31+5:30

डॉ. मनमोहनसिंग सोमवारी मोतीलाल नेहरू प्लेस येथील आपल्या नवीन निवासस्थानी राहण्यास जात असून, त्यांचे स्वागत बंगल्यातील विविध पक्षी आणि जीव-जंतू करतील

Welcome to the new home of the former Prime of various birds | विविध पक्षी करतील माजी पंतप्रधानांचे नवीन घरात स्वागत

विविध पक्षी करतील माजी पंतप्रधानांचे नवीन घरात स्वागत

Next

नवी दिल्ली : डॉ. मनमोहनसिंग सोमवारी मोतीलाल नेहरू प्लेस येथील आपल्या नवीन निवासस्थानी राहण्यास जात असून, त्यांचे स्वागत बंगल्यातील विविध पक्षी आणि जीव-जंतू करतील. यामध्ये वटवाघुळांचादेखील समावेश असेल. ल्युटियन झोनच्या हृदयस्थानी तीन एकरात असलेल्या ३, मोतीलाल नेहरू प्लेस बंगल्यातील पिंपळ, अर्जुन, उंबर, जांभूळ, कडूनिंब, गुलमोहर, आंबा आदी ४० मोठ्या झाडांवर पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या सुमारे ६० प्रजातींची घरटी आहेत. ऐसपैस असलेल्या टाईप-८ बंगल्याच्या परिसरात पुष्कळ वटवाघूळ आहेत. गणना झाली नाही. मात्र, त्यांची संख्या २०० हून अधिक असू शकते, असे मावळते पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबासाठी घर सज्ज करीत असलेले सीपीडब्ल्यूडीचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले. ल्युटियन झोनमध्ये अनेक जुनी झाडं असल्याने या भागात वटवाघूळ असू शकतात; परंतु गणना झालेली नसल्याने त्यांची नेमकी संख्या किती याबद्दल माहिती उपलब्ध नाही, असे दिल्लीचे मुख्य वन्यजीव वॉर्डन ए.के. शुक्ला म्हणाले. सध्यातरी वटवाघूळ गणनेचा प्रस्ताव नाही; परंतु यासाठी स्वयंसेवी संघटनांना प्रोत्साहित केल्या जाऊ शकतो, असेही ते म्हणाले. या बंगल्यात पक्ष्यांच्या विविध प्रजाती आहेत. बंगल्यातील झाडांवर कबुतर, मैना, कोकिळा, घुबड, किंगफिशर आणि बुलबुल यांचीदेखील घरटी आहेत. बंगल्याच्या परिसरात कमळाची फुले असलेला एक तलावदेखील आहेत. येथील वनस्पती आणि जीवजंतूंची हानी होणार नाही, याची काळजी बंगल्याची दुरुस्ती करताना घेण्यात आली. याआधी या बंगल्यात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित राहत होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Welcome to the new home of the former Prime of various birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.