पृथ्वीच्या गर्भात काय?
By admin | Published: August 15, 2015 01:46 AM2015-08-15T01:46:28+5:302015-08-15T01:46:28+5:30
संपूर्ण पृथ्वी जिंकणाऱ्या मानवाने झेप घेत चंद्रावर पाऊल ठेवत अंतराळालाही कवेत घेतले आहे. एवढेच नाहीतर समुद्राचाही ठाव मानवाने घेतला आहे. तथापि, पृथ्वीच्या गर्भात काय दडलंय?
लंडन : संपूर्ण पृथ्वी जिंकणाऱ्या मानवाने झेप घेत चंद्रावर पाऊल ठेवत अंतराळालाही कवेत घेतले आहे. एवढेच नाहीतर समुद्राचाही ठाव मानवाने घेतला आहे. तथापि, पृथ्वीच्या गर्भात काय दडलंय? याचा शोध मात्र घेता आलेला नाही. पृथ्वीचा केंद्रबिंदू ६ हजार किलोमीटर खोल आहे. एवढेच नाही, तर सर्वात बाहेरचा थरही आपल्या पायाखाली ३ हजार किलो मीटर खोल आहे.
रशियात भू-पृष्ठावर खोदण्यात आलेले वेधन छिद्र (कोला सुपरडीप बोअरहोल) १२.३ किलोमीटर खोलीवर आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाने उसळलेला तप्त लाव्हारस शेकडो किलो मीटर खोलीवर आहे. ही माहिती आजवरच्या संशोधनातून मिळाली असली तरी पृथ्वीच्या गर्भात नेमकं काय दडलंय? याचे गूढ आजही कायम आहे. पृथ्वीच्या खाली अनेक स्तर आहेत. कांद्याला जसे अनेक टरकलांचे आवरण असते तशीच पृथ्वीच्या खालची रचना आहे.
पृथ्वीच्या गाभ्याचा उलगडा कसा करावा, या दिशेनेही आता भू-गर्भशास्त्रज्ञांसह विज्ञान जगत प्रयत्नाला लागले आहे. (वृत्तसंस्था)
गुरुत्वाकर्षणाचा भू-पृष्ठावरील वस्तूंवर काय परिणाम होतो, याचे निरीक्षण करून पृथ्वीच्या वस्तुमानाचा अंदाज लावता येऊ शकतो. सबंध पृथ्वीच्या सरासरी घनतेपेक्षा भू-पृष्ठावरील वस्तूंची घनता कमी कमी असते.
दुसरी पायरी म्हणजे पृथ्वीचा गाभा कोणत्या कणखर पदार्थापासून बनला, यासंबंधी उकल करणे होय. पृथ्वीचा गाभा बव्हंशी लोहयुक्त आहे. या गाभ्याभोवती ८० टक्के लोह असल्याचे गृहीत धरले तरी नेमके किती प्रमाण आहे, याबाबत खल करावा.
साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या पृथ्वीच्या गाभ्यातही मोठ्या प्रमाणावर लोह असल्याचे सिंद्धात सांगतो.