अतिरिक्त प्रशासन प्रक्रीया म्हणजे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 04:27 PM2018-11-13T16:27:28+5:302018-11-13T16:29:24+5:30
प्रश्न- दुतावास अधिकाऱ्याबरोबर झालेल्या व्हीसा मुलाखतीमध्ये मला अधिनियम 221(जी) अंतर्गत नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. माझ्या अर्जासाठी अतिरिक्त प्रशासन प्रक्रीयेची गरज असल्याचे त्यांनी सांगिले. ही प्रशासन चौकशी काय असते आणि आता मी काय करु?
प्रश्न- दुतावास अधिकाऱ्याबरोबर झालेल्या व्हीसा मुलाखतीमध्ये मला अधिनियम 221(जी) अंतर्गत नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. माझ्या अर्जासाठी अतिरिक्त प्रशासन प्रक्रीयेची गरज असल्याचे त्यांनी सांगिले. ही प्रशासन चौकशी काय असते आणि आता मी काय करु?
उत्तर- अधिनियम 221 (जी) अमेरिकन इमिग्रेशन आणि राष्ट्रीयत्वासंबंधात आहे. इमिग्रंटस आणि नॉन इमिग्रंटसच्या व्हीसा निर्णयप्रक्रीये संदर्भात तो आहे. ज्यावेळेस वाणिज्यदुतावास अधिकाऱ्यांना व्हीसा अर्जावर अधिक माहितीची व कागदपत्रांची गरज आवश्यक वाटते तेव्हा त्यांना अधिनियम 221 (जी) अर्ज नाकारण्याचा अधिकार असतो. त्यानंतर त्यांना नक्की कोणती माहिती आणि कागदपत्रे हवी आहेत याची माहिती तसेच ती कशी सादर करायची याची माहिती ते अधिकारी देतील. सांगितल्याप्रमाणे आणि ठरवून दिलेल्या वेळेत तुम्ही ती कागदपत्रे व माहिती सादर करावी. तसेच दिलेली कागदपत्रे परत केली जात नसल्यामुळे मूळ कागदपत्रे सादर करू नयेत. जर व्हीसा फी भरल्यानंतर 12 महिन्यांच्या आत तुम्ही कागदपत्रे व माहिती सादर केली नाहीत तर पुन्हा नव्याने व्हीसा फी व व्हीसा अर्ज भरावा लागेल. 221 (जी) अंतर्गत एका वर्षांनी अर्ज 203 (इ) अंतर्गत नाकारला जातो.
काही विभागांना तुमच्याकडून अमेरिकन इमिग्रेशन आणि राष्ट्रीयत्व कायद्याअंतर्गत माहितीची गरज नसेल मात्र अमेरिकेतील इतर विभागांकडून व्हीसा अर्जासंदर्भातील माहिती ते मागवू शकतात. तुमच्या अर्जासंदर्भातील कायदेशीर माहितीची पूर्तता ते या सरकारी विभागांकडून करु शकतात. त्यामुळे तुमच्या मुलाखतीच्यावेळेस कोणत्याप्रकारच्या माहितीची आवश्यकता घेण्याची गरज आहे हे तुम्हाला सांगण्यात येईल आणि त्याची पूर्तता होईपर्य़ंत थांबण्याची सूचना देणारे पत्र पाठवले जाईल.
प्रशासन प्रक्रीया साधारणतः 60 दिवसांमध्ये पूर्ण केली जाते. अर्थात परिस्थितीनुसार या वेळेमध्ये बदल होऊ शकतो. मात्र प्रत्येकाच्या बाबतीत नक्की किती काळ लागू शकेल य़ाची माहिती आम्ही देऊ शकत नाही. सर्व अर्जदारांनी आपापले व्हीसा अर्ज लवकरात लवकर सादर करावेत असे आम्ही सूचवतो. तुम्ही तुमच्या व्हीसाची सद्यस्थिती https://ceac.state.gov/CEAC/. येथे पाहू शकता. जर प्रशासकीय प्रक्रीयेमध्ये तुमचा अर्ज 60 दिवसांपेक्षा अधिक काळ असल्यास तुम्ही support-india@ustraveldocs.com येथे चौकशी करु शकता. तसेच www.ustraveldocs.com येथे जाऊन अॅप्लीकेशन पेंडिंग फर्दर अॅक्शन हा पर्याय शोधू शकता.