शुन्यातलं जगणं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 03:51 PM2020-03-28T15:51:43+5:302020-03-28T15:52:06+5:30
कोणाला हा वेळ खायला उठलाय, या रिकामपणाचं काय करायचं असा प्रo्न काहींना पडलाय, तर हे शांत, थांबलेलं, शुन्यातलं आयुष्य अनेक जण अक्षरश: जगून घेताहेत. कारण त्यांनाही माहीत आहे, आज जरी हे जग थंडावलेलं असलं, तर काही काळानं याचा वेग पहिल्यापेक्षा जास्त, अगदी दुपटीवर जाऊन पोहोचेल.
लोकमत-
कोरोनामुळे जगभरातल्या लोकांचं आयुष्य थंडावलं आहे. एका क्षणात हा वेग जणू शुन्यावर आला आहे. कोणाला हा वेळ खायला उठलाय, या रिकामपणाचं काय करायचं असा प्रo्न काहींना पडलाय, तर हे शांत, थांबलेलं, शुन्यातलं आयुष्य अनेक जण अक्षरश: जगून घेताहेत. कारण त्यांनाही माहीत आहे, आज जरी हे जग थंडावलेलं असलं, तर काही काळानं याचा वेग पहिल्यापेक्षा जास्त, अगदी दुपटीवर जाऊन पोहोचेल.
या सक्तीच्या विर्शांतीच्या काळात खेळाडू काय करताहेत? मैदानावर घाम गाळण्याशिवाय गत्यंतर नसलेल्या खेळाडूंनाही आता घरी बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ‘एनबीए’ (नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन) ही जगभरात मान्यता असलेली बास्केटबॉलची मोठी लिग. त्यातले स्टार सध्या काय करताहेत, म्हणून त्यांचा आढावा घेतला. हे खेळाडूही आता आपलं आयुष्य एका वेगळ्या अर्थानं जगून घेताहेत. पर्सनल लाइफ नसलेले हे खेळाडू वेळेअभावी अगदी साध्या साध्या गोष्टीही करू शकले नव्हते. त्या गोष्टी ते आता करताहेत.
डॅनी ग्रीन हा आघाडीचा खेळाडू म्हणतो, माझ्या व्यस्त दिनक्रमामुळे माझ्या गर्लफ्रेंडला देण्यासाठीही माझ्याकडे वेळ नव्हता. आता मी तिला भरपूर वेळ देतोय. बास्केटबॉलच्या कोर्टवर जाता येत नाही, याची अस्वस्थता आहेच, पण पर्सनल आयुष्यालाही आणि ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे, त्यांनाही वेळ द्यायचा असतो, हे मला आज उमगलं.
लेब्रॉन जेम्स म्हणतो, माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत मी बास्केटबॉलपटूच राहीन, पण आता भूतकाळातही मी डोकावून पाहतोय. त्यामुळेच आपल्या शाळकरी वेळेपासूनच्या सगळ्या आठवणी त्यानं जाग्या केल्यात. भूतकाळातले सुंदर सोनेरी क्षण आठवताना त्यावेळचे फोटो, व्हीडीओ पुन्हा एकदा पाहिले. सोशल मीडीयावर शेअर केले. रोनाल्डोपासून ते नेमारपर्यंत आपल्या आवडत्या फुटबॉलपटूंचे व्हीडीओ एकामगोमाग एक पाहताना स्वत:ला त्यात गुंतवून टाकलं.
क्विन कुकनं आपल्या वर्कआऊटकडे पुन्हा एकदा लक्ष दिलं. पुशअप्सपासून तर इतरही शारीरिक कसरतींचे जे चॅलेन्जेस त्यानं घेतले होते, त्याचे व्हीडीओ एकमेकांना शेअर केले. कुक म्हणतो, आजच्या कठीण काळात आपल्या प्रत्येकाची काही जबाबदारी आहे. आपण ती नीट निभावलीच पाहिजे. पण एक मात्र खरं, तुम्ही कितीही मोठे असा, प्रत्येकाला या साथीनं अगदी सामान्य करून टाकलं आहे. सर्वांना एकाच पातळीवर आणताना लहान-मोठा हा भेदही मिटवून टाकला आहे.