आनंदी राहण्यासाठी काय हवे? हा आहे कानमंत्र... एकटेपणा सर्वात माेठा शत्रू, ८७ वर्षांचे संशाेधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 06:51 AM2024-12-02T06:51:25+5:302024-12-02T06:51:45+5:30
अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात १९३८ पासून यावर संशाेधन सुरू आहे. डाॅ. जाॅर्ज वॅलेंट यांच्या नेतृत्त्वात हे संशाेधन सुरू झाले हाेते.
वाॅशिंग्टन : माणसाला आनंदी राहण्यासाठी काय हवे? अनेकांची उत्तरे वेगवेगळी असतील. काही जणांना भाैतिक सुखांमध्ये जास्त आनंद मिळताे. मात्र, अंतिमत: खरा आनंद हा चांगल्या नातेसंबंधात असताे आणि एकटेपणा हा माणसाचा सर्वात माेठा शत्रू आहे, असे सिद्ध झाले आहे. ८७ वर्षांपासून सुरू असलेल्या एका संशाेधनातून ही बाब लक्षात आली आहे.
अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात १९३८ पासून यावर संशाेधन सुरू आहे. डाॅ. जाॅर्ज वॅलेंट यांच्या नेतृत्त्वात हे संशाेधन सुरू झाले हाेते. (वृत्तसंस्था)
संशाेधनात काय?
nअनेक वर्षांपासून गाेळा करण्यात आलेल्या माहितीतून काही महत्त्वाची माहिती मिळाली. माणसाला आनंदासाठी ‘सामाजिक फिटनेस’ हवा. त्यासाठी आपल्या नातेसंबंधाचे आकलन करावे.
nचांगली नाती टिकवण्यासाठी आपण किती प्रयत्न करताे, जवळच्या नात्यांकडे किती लक्ष देताे इत्यादी गाेष्टींवर विचार करायला हवा. चांगले सामाजिक संबंध मेंदूच्या आराेग्यासाठी खूप चांगले असतात.
संशाेधन आता दुसऱ्या टप्प्यात
मानसाेपचारतज्ज्ञ डाॅ. राॅबर्ट वाल्डिंगर यांच्या माहितीनुसार, संशाेधन आता दुसऱ्या टप्प्यात पाेहाेचले आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील सहभागी लाेकांच्या मुलांचा अभ्यास करण्यात येत आहे. बदलता काळ, तंत्रज्ञान, बदललेली पिढी इत्यादीच्या आधारे माहिती गाेळा केली जात आहे.
‘एकटेपणा महामारीसारखाच’
डाॅ. राॅबर्ट वाल्डिंगर यांनी सांगितले की, आराेग्याचा परिणाम नात्यांवर हाेताे. काेराेना महामारीच्या काळाचा वेगळा अभ्यास करण्यात आला. त्यात आढळले की, एकटेपणा हा महामारीप्रमाणे आहे. त्याचा आराेग्यावर सर्वाधिक परिणाम हाेताे. ज्येष्ठांमध्ये एकटेपणामुळे हृदयराेग निर्माण हाेऊ शकताे.