व्हिसासाठी अर्ज करताना प्रायोजकाची आर्थिक स्थिती दर्शवण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 11:27 PM2022-04-09T23:27:24+5:302022-04-09T23:30:01+5:30

काही अपवाद वगळता अमेरिकन कायद्यानुसार अर्जदाराला त्याच्याकडे पुरेशी आर्थिक संसाधने आहेत हे सिद्ध करावे लागते.

what documents required for sponsors while applying for immigrant visa | व्हिसासाठी अर्ज करताना प्रायोजकाची आर्थिक स्थिती दर्शवण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात?

व्हिसासाठी अर्ज करताना प्रायोजकाची आर्थिक स्थिती दर्शवण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात?

googlenewsNext

प्रश्न: बऱ्याचशा इमिग्रंट व्हिसासाठी पात्र ठरण्यासाठी आर्थिक प्रायोजकाची गरज असते असं मी ऐकलं आहे. माझ्या प्रायोजकाची आर्थिक स्थिती दर्शवण्यासाठी कोणती कागदपत्रं आणायला हवीत?

उत्तर- काही अपवाद वगळता अमेरिकन कायद्यानुसार अर्जदाराला त्याच्याकडे पुरेशी आर्थिक संसाधने आहेत हे सिद्ध करावे लागते. अर्जदाराचे उत्पन्न गरिबी मार्गदर्शक तत्वांच्या किमान 125 टक्के अधिक असायला हवे. इमिग्रंट्स अमेरिकन सरकारच्या आर्थिक सहाय्यावर अवलंबून राहू नये हे यामागचं कारण आहे. सध्याच्या गरिबी मार्गदर्शक तत्त्वांची माहिती तुम्हाला अमेरिकन सरकारच्या आरोग्य आणि मानवी सेवांच्या संकेतस्थळावर मिळेल. लिंकवर जाण्यासाठी क्लिक करा.

तुमच्या प्रायोजकाने आयआरएस टॅक्स रिटर्न ट्रान्स्क्रिप्ट जमा करायला हवे असे अमेरिकेचा मुंबईतील दूतावास तुम्हाला सुचवतो. त्यासाठी तुम्ही ऑनलाइन विनंती करू शकता किंवा मेल करू शकतात. 

यामुळे अमेरिकन सरकारला उत्पन्नाचा अधिकृत पुरावा मिळतो. त्यासोबतच ते त्यांच्या वैयक्तिक टॅक्स रिटर्नची कॉपी (अर्ज 1040) आणि त्यांच्या कंपनीकडून मिळालेली कर कागदपत्रं (फॉर्म W-2) जमा करू शकता. तुमच्या अर्जदाराने त्या कर वर्षासाठीचा W-2 अर्ज समाविष्ट करेपर्यंत दूतावास अधिकारी 1040 अर्ज स्वीकारणार नाही. अमेरिकन सरकारकडे रिपोर्ट होणाऱ्या उत्पन्नाबद्दल अनियमितता असू नये यासाठी हे केले जाते.

प्रश्न- अर्ज 1040 आणि अर्ज W-2 अर्ज यांच्यात काय फरक असतो?

उत्तर- कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांची माहिती IRS ला देण्यासाठी W-2 अर्जाचा वापर करतात. अमेरिकन करदाते त्यांच्या एकूण उत्पन्नाची माहिती IRS स्वतःहून देण्यासाठी अर्ज 1040 चा वापर करतात. W-2 किंवा IRS ट्रान्स्क्रिप्टकडून या माहितीची खातरजमा होईपर्यंत ही माहिती कमी विश्वासार्ह मानली जाते.  

प्रश्न- माझ्या मुख्य प्रायोजकचे उत्पन्न कमी असल्यास मला आणखी कोण आर्थिक सहाय्य करू शकतं?

उत्तर- तुमच्या मुख्य प्रायोजकाचे उत्पन्न सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फारच कमी असल्याचं दूतावासातील कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यास तुम्ही तुमच्या अर्जात सह प्रायोजक ऍड करू शकता. सह प्रायोजक हा अमेरिकेचा नागरिक किंवा कायदेशीर कायमस्वरूपी नागरिक (ग्रीनकार्ड धारक) असायला हवा, ज्याच्यासोबत तुमचे आणि अर्जदाराचे विश्वासार्ह संबंध असायला हवेत. उदाहरणार्थ, तुमच्या पती/पत्नीची आई अमेरिकेत कायदेशीर वास्तव्य करत असल्यास आणि उत्पन्न कमावत असल्यास ती तुमचा अर्ज स्पॉन्सर करण्यास पात्र ठरू शकते. सह प्रायोजकांनी त्यांचे आर्थिक पुरावे आणि अमेरिकन नागरिकत्व किंवा कायदेशीर नागरिक स्टेटस दाखवणाऱ्या कागदपत्रांसोबत फॉर्म आय-864 जमा करायला हवा. जर सह प्रायोजकासोबत त्याच्या घरातील सदस्यही एकत्रित कर भरत असल्यास त्यांनीही आय-864ए जमा करायला हवा.

तुम्ही पहिल्यांदा अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर तुमच्या सह प्रायोजकाचे कर्तव्य सुरू होते हे लक्षात घ्या. तुम्ही अमेरिकेचे नागरिक होईपर्यंत किंवा अमेरिका सोडेपर्यंत प्रायोजक तुम्हाला आर्थिक मदत पुरवणार असा सहाय्य शपथपत्राचा अर्थ होतो. ते शपथपत्र म्हणजे कायदेशीर करार आहे. तुमच्या सह प्रायोजकांनी तुमच्या वतीने शपथपत्र दाखल करण्यापूर्वी त्यांना या सगळ्या अटींची माहिती असेल याची खात्री करून घ्या.
 

Web Title: what documents required for sponsors while applying for immigrant visa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.