अमेरिकेच्या C1/D व्हिसासाठी अर्ज करताना लागणारं जॉईनिंग लेटर म्हणजे नक्की काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 02:34 PM2022-03-12T14:34:27+5:302022-03-12T14:37:34+5:30
अमेरिकेतून जाणाऱ्या प्रवाशांना C1/D व्हिसाची गरज भासते. जहाजं आणि विमानांमधील कर्मचाऱ्यांना हा व्हिसा आवश्यक असतो.
प्रश्न: मला जहाजावर काम करण्यासाठी जायचंय. त्यासाठी मला C1/D व्हिसासाठी अर्ज करायचाय. मी जॉईनिंग लेटर आणणं अपेक्षित आहे. C1/D अर्जदारांसाठी जॉईनिंग लेटर म्हणजे नेमकं काय असतं?
उत्तर: अमेरिकेतून जाणाऱ्या प्रवाशांना C1/D व्हिसाची गरज भासते. जहाजं आणि विमानांमधील कर्मचाऱ्यांना हा व्हिसा आवश्यक असतो.
मुलाखतीचा भाग म्हणून C1/D अर्जदारांना त्यांचा पासपोर्ट, त्यांचं वैध कन्टिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट (सीडीसी)/सीमॅन बुक आणि जॉईनिंग लेटर दाखवावं लागतं.
जॉईनिंग लेटर हे एक कागदपत्र असून ते भारतात नोंद असलेल्या स्थानिक मॅनिंग एजन्सीकडून मिळतं. त्यात तुमचं नाव, तुमचा पासपोर्ट नंबर, तुमची जन्म तारीख, तुमची रँक, तुम्ही जॉईन करत असलेल्या जहाजाचं नाव, तुम्ही कोणत्या बंदरावरून जॉईन करणार आहात त्या बंदराचं नाव आणि तुमच्या जॉईनिंगची तारीख अशी माहिती असते. तुमची मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यासाठी ही माहिती महत्त्वाची असचते. तुमच्या जॉईनिंग लेटरबद्दलशी संबंधित प्रश्नांना स्पष्ट आणि प्रामाणिक उत्तरं देण्याची तयारी तुम्ही करायला हवी. तुम्हाला प्रश्न न कळल्यास तुम्ही अधिकाऱ्याला तो पुन्हा विचारायला सांगू शकता किंवा स्थानिक भाषेतल्या दुभाषासाठी विनंती करू शकता.
जॉईनिंग लेटर हे एम्प्लॉयमेंट लेटर किंवा ऑफर लेटरसारखंच असतं. पण त्यामध्ये थोडा फरक असतो. जॉईनिंग लेटर स्थानिक मॅनिंग एजन्सीमधून मिळतं. त्यावर भारतीय पत्ता आणि भारतातला संपर्क असतो. एम्प्लॉयमेंट लेटर त्यासारखं दिसतं. मात्र बहुतांशवेळा ते अमेरिका किंवा इतर देशांमधून येतं, भारतातून येत नाही.
जॉईनिंग लेटरची वैधता पडताळून पाहण्यासाठी दूतावासातील अधिकारी लोकल मॅनिंग एजन्सीसोबत नियमितपणे फॉलो अप घेतात. खोटं जॉईनिंग लेटर सादर केल्यास तुम्हाला कायमस्वरुपी अमेरिकेत प्रवेशबंदी केली जाऊ शकते. यासोबतच भारतीय सुरक्षा विभागांकडे यासंदर्भात गुन्हेगारी कारवाईसाठी संपर्क साधला जाऊ शकतो.
मुलाखतीसाठी येताना स्वीकारार्ह जॉईनिंग लेटर न आणल्यास, इमिग्रेशन अँड नॅशनलिटी कायद्याच्या कलम २२१ (जी) च्या अंतर्गत अधिकारी तुमचा अर्ज नाकारू शकतात. वैध सीडीसी न आणल्यास किंवा त्याची वैधता संपली असल्यास आणि त्याचं नुतनीकरण झालं नसल्यासही २२१ (जी) च्या अंतर्गत अर्ज नाकारला जाऊ शकतो. असं झाल्यास, तुम्ही आवश्यक कागदपत्रं व्हिसा अर्ज केंद्रात तुमच्या पासपोर्ट आणि २२१ (जी) अर्जासह जमा करू शकता. तुम्हाला नवी अपॉईंटमेंट घ्यावी लागत नाही आणि जॉईनिंग लेटर जमा करण्यासाठी शुल्क आकारलं जात नाही. अतिरिक्त कागदपत्रं किंवा फॉलोअप मुलाखतीसाठी दूतावास किंवा वकिलात तुमच्याशी संपर्क साधेल.
महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.