नॉन-इमिग्रंट व्हिसा म्हणजे नेमके काय? कलम २२१ (जी) अंतर्गत पत्र आल्यास काय करावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 09:09 AM2022-07-31T09:09:59+5:302022-07-31T09:10:21+5:30

मुलाखतीदरम्यान किंवा ड्रॉपबॉक्स प्रकरणात प्राथमिक पडताळणीमध्ये व्हिसाची पात्रता ठरवता आलेली नाही.

What exactly is a non-immigrant visa? | नॉन-इमिग्रंट व्हिसा म्हणजे नेमके काय? कलम २२१ (जी) अंतर्गत पत्र आल्यास काय करावे?

नॉन-इमिग्रंट व्हिसा म्हणजे नेमके काय? कलम २२१ (जी) अंतर्गत पत्र आल्यास काय करावे?

googlenewsNext

प्रश्न : यूएस कॉन्सुलेट जनरल, मुंबई यांच्याकडून मला प्राप्त झालेल्या पत्रात, मला यूएस इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी कायद्याच्या कलम २२१ (जी) अंतर्गत नॉन-इमिग्रंट व्हिसा देण्यास नकार देण्यात आला आहे. याचा अर्थ काय आहे? मी यासाठी अपॉइंटमेंट घेऊ शकतो का, की यूएस कॉन्सुलेट जनरल, मुंबई येथे कोणत्याही कामाच्या दिवशी जाऊ शकतो? 

उत्तर : आम्हाला कल्पना आहे की सर्व क्रमांक आणि कोड एकत्र बघून ‘नकार’ या शब्दामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. पण, याकरिता फार काळजी करू नका. सोप्या शब्दात सांगायचे तर या नकाराचा अर्थ तुमचे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी  प्रलंबित ठेवलेले आहे. अधिक स्पष्ट करायचे तर, जेव्हा यूएस इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी कायद्याच्या कलम २२१ (जी) अंतर्गत व्हिसा अर्ज नाकारला जातो, याचा सोपा अर्थ मुलाखतीदरम्यान किंवा ड्रॉपबॉक्स प्रकरणात प्राथमिक पडताळणीमध्ये व्हिसाची पात्रता ठरवता आलेली नाही. ए २२१ (जी) नुसार नकाराची स्थिती तेव्हाच निर्माण होते जेव्हा अतिरिक्त माहिती हवी असते किंवा दुसरा स्त्रोत आणि / किंवा पुढील प्रशासनिक प्रक्रिया गरजेची असते. व्हिसाची पात्रता निश्चित झाली की, ए २२१ (जी) चा नकार निकाली निघतो. थोडक्यात, ए २२१ (जी) नुसार नकार आला म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी नकार आला असे नाही. 

त्यामुळे, तुम्हाला ए २२१ (जी) अंतर्गत नकार आला आणि पुढील कागदपत्रे किंवा माहिती द्यावी लागली तर काय करायचे ? तर, यूएस कॉन्सुलेट जनरल, मुंबईने अलीकडेच कागदपत्रे सादर करण्याच्या प्रक्रियेत बदल केलेला आहे.

व US काउन्सलेटच्या सहकार्याने
५ जुलै २०२२ पासून, जर तुम्हाला बोटांचे ठसे देण्यासाठी किंवा मुलाखतीसाठी बोलावले तर तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंटची गरज नाही. खाली नमूद केल्याप्रमाणे तुम्ही  कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी १०.३० ते सकाळी ११ या दरम्यान कॉन्सुलेटमध्ये तुमच्या पासपोर्टसह आणि २२१ (जी) पत्रामध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांसह येऊ शकता. 

मुलाखतीच्या विनंतीशिवाय ए २२१ (जी) नुसार अतिरिक्त कागदपत्रे सादर करायची असतील तर जवळच्या व्हिसा असिस्टन्स सेंटर (VAS) येथे अथवा दुसऱ्या निश्चित केलेल्या ठिकाणी सादर करू शकता. त्यानुसार अधिक शुल्क लागू शकते. 
जर तुम्हाला ए २२१ (जी) प्रशासनिक प्रक्रियेसाठी प्राप्त झालेले असेल, तर अर्जदाराने पुढे कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकरणातील पुढील कार्यवाहीसाठी कॉन्सुलेट अर्जदाराशी संपर्क साधते. 

अमेरिकेतील काही विशिष्ट, भारतातील स्थानिक सुट्ट्यांनुसार आणि सामान्यपणे प्रत्येक महिन्यातील शेवटच्या बुधवारी आमची कार्यालये व्हिसा सेवेसाठी बंद असतात. कॉन्सुलेटला भेट देण्यापूर्वी कृपया आमची वेबसाईट https://in.usembassy.gov/holiday-calendar तपासावी.  

महत्त्वाची सूचना
व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास,support-india@ustraveldocs.comवर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठीhttp://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हांला फॉलो करा.

Web Title: What exactly is a non-immigrant visa?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Visaव्हिसा