मृत्युआधी जास्तीत जास्त लोक कोणते ३ शब्द बोलतात? नर्सने केला खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 06:29 PM2021-11-19T18:29:28+5:302021-11-19T18:31:11+5:30
ज्यूलीने टिकटॉकवरील एका व्हिडीओत हा खुलासा केला. तिने हॉस्पिटलमधील तिचे अनुभव शेअर केले आहेत. चला जाणू घेऊ काय म्हणाली नर्स....
अमेरिकेतील (America) एका नर्सने सोशल मीडियावर एक धक्कादायक खुलासा केला आहे. या नर्सचं नाव ज्यूली आहे. ती म्हणाली की, मृत्युच्या ठीक आधी जास्तीत जास्त लोक काय बोलतात. ज्यूलीने टिकटॉकवरील एका व्हिडीओत हा खुलासा केला. तिने हॉस्पिटलमधील तिचे अनुभव शेअर केले आहेत. चला जाणू घेऊ काय म्हणाली नर्स....
हॉस्पिस नर्स ज्यूलीने सांगितलं की, तिने कॅलिफोर्नियाच्या (California) लॉस एंन्जलिसमध्ये (Los Angelis) नर्स म्हणून जवळपास ५ वर्षे काम केलं. याआधी ९ वर्षे ती आयसीयूमध्ये नर्स होती. ती साधारण १४ वर्षापासून नर्सचं काम करत आहे.
ज्यूली फार जास्त आजारी, ज्यांचा कधीही जीव जाऊ शकतो अशा रूग्णांची देखरेख करते. तिने बऱ्याच लोकांना आपल्या डोळ्यासमोर अखेरचा श्वास घेताना पाहिलं आहे. नुकतंच तिने एका टिकटॉक व्हिडीओत सांगितलं की, मृत्युआधी जास्तीत जास्त लोक काय बोलतात?
मृत्युआधी काय होतं?
ज्यूलीने सांगितलं की, मृत्युच्या ठीक आधी तिने जास्तीत जास्त रूग्णांच्या श्वास घेण्याच्या पद्धतीत बदल होताना पाहिलंय. त्यासोबतच त्वचेच्या रंगात बदल, ताप येणे, पुन्हा-पुन्हा जवळच्या लोकांचं नाव घेणे इत्यादी लक्षणे तिने रूग्णांमध्ये पाहिली आहेत.
ज्यूली पुढे म्हणाली की, 'जास्तीत जास्त लोक सामान्यपणे 'आय लव्ह यू' म्हणतात किंवा ते त्यांच्या आई-वडिलांना हाका मारतात, जे आधीच या जगात नसतात'.
एका दुसऱ्या व्हिडीओत ज्यूली म्हणाली की, अखेरचा श्वास घेण्याआधी तिच्या जास्तीत जास्त रूग्णांना सावल्या दिसत होत्या. सावल्यांमध्ये ते त्यांच्या मृत्युमुखी पडलेल्या जवळच्या लोकांना बघत होते. आणि म्हणत होते की, ते 'घरी' येत आहेत. नर्स पुढे म्हणाली की, माझ्याकडे मृत्यू आणि मरणाबाबत बरीच माहिती आहे. ज्याबाबत जास्त लोकांना माहिती नसते.