संकटं संपता संपेना! कोरोनानंतर आता Mad Cow Disease चा कहर; जाणून घ्या, काय आहेत लक्षणं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 09:29 PM2021-04-05T21:29:37+5:302021-04-05T21:36:46+5:30

Mad Cow Disease : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एक रहस्यमय आजार समोर आला आहे.

what is mad cow disease in canada and other parts of the world | संकटं संपता संपेना! कोरोनानंतर आता Mad Cow Disease चा कहर; जाणून घ्या, काय आहेत लक्षणं? 

संकटं संपता संपेना! कोरोनानंतर आता Mad Cow Disease चा कहर; जाणून घ्या, काय आहेत लक्षणं? 

googlenewsNext

जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील सर्वच देश कोरोनाचा सामना करत आहे. मात्र आता धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एक रहस्यमय आजार समोर आला आहे. मॅड काऊ डिसीज (Mad Cow Disease) असं या आजाराचं नाव असून हा अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. कॅनडामध्ये या खतरनाक आजाराचे काही रुग्ण आढळून आले असून तिथे परिस्थिती गंभीर आहे.  

कॅनडामध्ये 2015 रोजी मॅड काऊ आजाराचे पाच रुग्ण पहिल्यांदाच सापडले होते. गेल्यावर्षी 24 रुग्ण सापडले तर या वर्षी 2021 मध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता एकदम 43 जणांना हा आजार झाला असून त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आजार bovine spongiform encephalopathy (BSE) या नावाने देखील ओळखला जातो. या आजारात रुग्णांच्या जीवाला धोका आहे. मेंदूतील पेशींवर हल्ला करणाऱ्या या आजाराची लक्षणं या पेशींचं बरंच नुकसान झाल्यावर दिसायला लागतात. जर योग्य उपचार झाले नाहीत तर रुग्णाचा मृत्यू होतो. लक्षणं दिसायला 1 ते 2 वर्षे लागतात. 

जाणून घ्या लक्षणं

माणसाचा स्मृतिभ्रंश होतो, त्याच्या शरीरावरचं नियंत्रण कमी होतं आणि शेवटी शरीराचं संचलन करणारी यंत्रणाच निकामी होते. हा आजार झालेली व्यक्ती गोष्टी विसरू लागते. अंग दुखी, स्नायू आखडणे अशी लक्षणेही आढळतात. 18 ते 36 महिन्यांच्या कालावधीत रुग्णांना जिथं मेंदूला ताण द्यावा लागतो अशी कामं करण्यात अडचणी येऊ लागतात. मॅड काऊ आजाराचं निदान करण्यासाठी डॉक्टर ECG, मेंदूचा MRI या चाचण्या करायला सांगतात. कधीकधी मेंदूतील किंवा पाठीच्या मणक्यातील स्रावांची चाचणी करतात. सुरुवातीला साधी लक्षणं दिसतात त्यामुळे रुग्ण दुर्लक्ष करतो आणि मग आजार बळावतो. 

Web Title: what is mad cow disease in canada and other parts of the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.